दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्ज
ताज्या घडामोडी
बुलडाणा जिल्ह्यात गुलाबी बोंडअळीने नुकसानपातळी ओलांडली
बुलडाणा : जिल्ह्यात सुमारे १७४ गावांत गुलाबी बोंडअळीने थैमान घातले आहे. आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे.
बुलडाणा : जिल्ह्यात सुमारे १७४ गावांत गुलाबी बोंडअळीने थैमान घातले आहे. आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे. सर्वात जास्त नुकसान या महिन्यात १३३ गावशिवारात झाल्याचे आढळून आले. यंदा कापसाचे उत्पादन घटले आहे. आता यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. शेतकऱ्यांना उपाययोजना करण्याचे आवाहन केले जात आहे.
जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी बैठकीत प्रभावी उपाययोजना राबवून बोंडअळीवर नियंत्रण मिळवावे, असे निर्देश दिले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, कृषी विद्यापिठाचे शास्त्रज्ञ डॉ. सी. पी. जायभाये उपस्थित होते. रामामूर्ती म्हणाले, ‘‘कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अनेक ठिकाणी नुकसानीची पातळी गाठली आहे. कृषी विभाग विविध उपाय योजनांतून अळीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे.’’
नाईक म्हणाले, ‘‘ बोंड अळी नियंत्रणासाठी शिफारस असलेल्या त्यातही धुरीजन्य कीटकनाशकाची निवड करावी. त्याचप्रमाणे कृषी विद्यापीठांच्या शिफारसीनुसार कामगंध सापळे उभारावेत. जिनिंग परिसरात किमान २० ते २५ कामगंध सापळे लावावे. जेणेकरून नर पतंग सापळ्याकडे आकर्षित होऊन मरतील.’’
‘‘जनजागृती करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. शेतीशाळा होतील. ग्राम स्तरावरील कृषी यंत्रणेमार्फत जास्त प्रादुर्भाव असलेल्या शेतांमध्ये शेतकऱ्यांना सायंकाळी फवारणीचे प्रात्यक्षिक देण्यात येणार आहे. १७४ गावांमध्ये बोंड अळीमुळे आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे,’’ असेही नाईक यांनी सांगितले.
- 1 of 1023
- ››