agriculture news in marathi In Buldana district, the pink bollworm crossed the damage level | Agrowon

बुलडाणा जिल्ह्यात गुलाबी बोंडअळीने नुकसानपातळी ओलांडली

टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

बुलडाणा : जिल्ह्यात सुमारे १७४ गावांत गुलाबी बोंडअळीने थैमान घातले आहे. आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे.

बुलडाणा : जिल्ह्यात सुमारे १७४ गावांत गुलाबी बोंडअळीने थैमान घातले आहे. आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे. सर्वात जास्त नुकसान या महिन्यात १३३ गावशिवारात झाल्याचे आढळून आले. यंदा कापसाचे उत्पादन घटले आहे. आता यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. शेतकऱ्यांना उपाययोजना करण्याचे आवाहन केले जात आहे. 

जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी बैठकीत प्रभावी उपाययोजना राबवून बोंडअळीवर नियंत्रण मिळवावे, असे निर्देश दिले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, कृषी विद्यापिठाचे शास्त्रज्ञ डॉ. सी. पी. जायभाये उपस्थित होते.  रामामूर्ती म्हणाले, ‘‘कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अनेक ठिकाणी नुकसानीची पातळी गाठली आहे. कृ‍षी विभाग विविध उपाय योजनांतून अळीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे.’’ 

नाईक म्हणाले, ‘‘ बोंड अळी नियंत्रणासाठी शिफारस असलेल्या  त्यातही धुरीजन्य कीटकनाशकाची निवड करावी. त्याचप्रमाणे कृषी विद्यापीठांच्या शिफारसीनुसार कामगंध  सापळे उभारावेत. जिनिंग परिसरात किमान २० ते २५ कामगंध सापळे लावावे. जेणेकरून नर पतंग सापळ्याकडे आकर्षित होऊन मरतील.’’

‘‘जनजागृती करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. शेतीशाळा होतील. ग्राम स्तरावरील कृषी यंत्रणेमार्फत जास्त प्रादुर्भाव असलेल्या शेतांमध्ये शेतकऱ्यांना सायंकाळी फवारणीचे प्रात्यक्षिक देण्यात येणार आहे. १७४ गावांमध्ये बोंड अळीमुळे आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे,’’ असेही नाईक यांनी सांगितले.
 


इतर ताज्या घडामोडी
नाशिक बाजारात कारल्याचे दर टिकूननाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात हरभरा आला कापणीलाजळगाव ः जिल्ह्यात रब्बीची पेरणी २००...
प्रदर्शनातील कृषी ज्ञानाचा खजाना पाहून...माळेगाव, जि. पुणे ः कृषिक २०२१- कृषी तंत्रज्ञान...
पुणे विभागात उसाच्या ५५ टक्के लागवडीपुणे ः यंदा पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे...
देवना साठवण तलावाचा प्रलंबित प्रश्न...नाशिक : येवला तालुक्यातील अवर्षणप्रवण उत्तरपूर्व...
‘बर्ड फ्लू’ रोखण्यासाठी ९० दिवस...परभणी ः जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रसार आणि संसर्ग...
अतिवृष्टीचा मदत आठवड्यात मिळणारसोलापूर : गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या...
महावितरणच्या आदेशामुळे वीज ग्राहक...सोलापूर : कोरोनाच्या साथीमुळे घटलेले आर्थिक...
भंडारा जळीत प्रकरणाचा अहवाल शासनाकडे नागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू...
उन्हाळी सोयाबीन लागवडीस गतीअकोला : यंदाच्या खरीप सोयाबीन काढणीच्या वेळेस...
वारणेत उभारणार पशुवैद्यकीय महाविद्यालय...वारणानगर, जि. कोल्हापूर : येथील वारणा सहकारी...
बेदाणा पॅकिंगसाठीच्या बॉक्सच्या दरात...सांगली ः बेदाणा, डाळिंबासह अन्य फळभाज्यांच्या...
यवतमाळ : पोल्ट्रीत चार हजार कोंबड्यांचा...यवतमाळ : कोरोनाच्या संकटातून सावरू पाहणाऱ्या...
रिसोडमध्ये कांदा बीजोत्पादनाकडे कल रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात यंदा कांदा...
औरंगाबादेत सर्वच पक्षांकडून गुलालाची...औरंगाबाद : मतदानाची प्रक्रिया शांततेत पार...
पुणे जिल्ह्यात संमिश्र निकाल; दावे-...पुणे ः जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये...
साताऱ्यात स्थानिक आघाड्यांचा जल्लोषसातारा ः दोन दिवसांपूर्वी मतदान झाले. गेले दोन...
नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांनी सत्ता...नांदेड : नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे...
नाशिक जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्कानाशिक : जिल्ह्यात एकूण ६२१ ग्रामपंचायतीच्या...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या...यवतमाळ : माजी मुख्यमंत्री व जलक्रांतीचे प्रणेते...