बुलडाण्यात खरीप हंगामात ९५० कोटी रुपयांचा फटका

अतिवृष्टी, पूर परिस्थितीने यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सुमारे साडेनऊशे कोटींचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे शासनाने सर्व प्रकारच्या नुकसानाचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
बुलडाण्यात खरीप हंगामाला ९५० कोटी रुपयांचा फटका Buldana hits Rs 950 crore for kharif season
बुलडाण्यात खरीप हंगामाला ९५० कोटी रुपयांचा फटका Buldana hits Rs 950 crore for kharif season

बुलडाणा : अतिवृष्टी, पूर परिस्थितीने यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सुमारे साडेनऊशे कोटींचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे शासनाने सर्व प्रकारच्या नुकसानाचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.  यंदाच्या हंगामात पावसाच्या प्रत्येक महिन्यात अतिवृष्टी झाली. प्रामुख्याने ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस झाला. काही दिवस संततधार पाऊस, नदी-नाल्यांना आलेल्या पुरांमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने केलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात या हंगामात आजवर सुमारे एक लाख हेक्टरवरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला आहे. या पिकाचे हेक्टरी ४० ते ४५ हजारांचे नुकसान झाल्याचे मानले जाते. तर २४ हजार हेक्टरवरील कपाशी पिकालाही फटका बसला. १२ हजार हेक्टरवरील तुरीचेही नुकसान झाल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. या सोबतच मोठ्या प्रमाणात जमीनही खरडून गेलेली आहे. या खरडलेल्या जमिनीचे हेक्टरी साधारणतः एक ते सव्वा लाख रुपयांवर नुकसान झाल्याचे गृहीत धरले जात आहे. या सर्व नुकसानाची आकडेवारी सुमारे ९५० कोटींपर्यंत जाऊन पोचली आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.  यातील बरेच नुकसान हे पीकविम्याच्या कक्षेबाहेर जात आहे. निकषात बसणारे शेतकरी पीकविम्याला पात्र होतील. उर्वरीत शेतकऱ्यांच्या नुकसानाचे काय, असा प्रश्‍न या निमित्ताने होत आहे. सतत पाऊस झाल्याने शेतांमध्ये पाणी साचले. यामुळे पीक खराब झाले. सोयाबीनच्या उभ्या पिकात शेंगामधून कोंब फुटले. याचाही सर्वे करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीसुद्धा जिल्हा प्रशासनाकडून झाल्याचे समजते. मात्र, शासनाकडून अशा प्रकारच्या सर्वंकष सर्वेक्षणाला मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा केली जात आहे. 

रब्बी कसा साधायचा  खरिपाच्या भरवशावर रब्बी हंगाम शेतकरी साधत असतात. या हंगामात खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. मोठे नुकसान झाल्याने आता रब्बीत लागवडीसाठी पैसा कसा उभा करायचा, हा पेच शेतकऱ्यांसमोर बनलेला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com