Agriculture News in Marathi Buldana hits Rs 950 crore for kharif season | Page 2 ||| Agrowon

बुलडाण्यात खरीप हंगामात ९५० कोटी रुपयांचा फटका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 ऑक्टोबर 2021

अतिवृष्टी, पूर परिस्थितीने यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सुमारे साडेनऊशे कोटींचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे शासनाने सर्व प्रकारच्या नुकसानाचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. 

बुलडाणा : अतिवृष्टी, पूर परिस्थितीने यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सुमारे साडेनऊशे कोटींचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे शासनाने सर्व प्रकारच्या नुकसानाचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. 

यंदाच्या हंगामात पावसाच्या प्रत्येक महिन्यात अतिवृष्टी झाली. प्रामुख्याने ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस झाला. काही दिवस संततधार पाऊस, नदी-नाल्यांना आलेल्या पुरांमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने केलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात या हंगामात आजवर सुमारे एक लाख हेक्टरवरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला आहे.

या पिकाचे हेक्टरी ४० ते ४५ हजारांचे नुकसान झाल्याचे मानले जाते. तर २४ हजार हेक्टरवरील कपाशी पिकालाही फटका बसला. १२ हजार हेक्टरवरील तुरीचेही नुकसान झाल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. या सोबतच मोठ्या प्रमाणात जमीनही खरडून गेलेली आहे. या खरडलेल्या जमिनीचे हेक्टरी साधारणतः एक ते सव्वा लाख रुपयांवर नुकसान झाल्याचे गृहीत धरले जात आहे. या सर्व नुकसानाची आकडेवारी सुमारे ९५० कोटींपर्यंत जाऊन पोचली आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. 

यातील बरेच नुकसान हे पीकविम्याच्या कक्षेबाहेर जात आहे. निकषात बसणारे शेतकरी पीकविम्याला पात्र होतील. उर्वरीत शेतकऱ्यांच्या नुकसानाचे काय, असा प्रश्‍न या निमित्ताने होत आहे. सतत पाऊस झाल्याने शेतांमध्ये पाणी साचले. यामुळे पीक खराब झाले. सोयाबीनच्या उभ्या पिकात शेंगामधून कोंब फुटले. याचाही सर्वे करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीसुद्धा जिल्हा प्रशासनाकडून झाल्याचे समजते. मात्र, शासनाकडून अशा प्रकारच्या सर्वंकष सर्वेक्षणाला मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा केली जात आहे. 

रब्बी कसा साधायचा 
खरिपाच्या भरवशावर रब्बी हंगाम शेतकरी साधत असतात. या हंगामात खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. मोठे नुकसान झाल्याने आता रब्बीत लागवडीसाठी पैसा कसा उभा करायचा, हा पेच शेतकऱ्यांसमोर बनलेला आहे.


इतर ताज्या घडामोडी
मुंबई विमानतळावरून होणार दैनंदिन ६६०...मुंबई : कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने...
बैलगाडा शर्यतप्रकरणी सोमवारी सुनावणी राजगुरुनगर, जि. पुणे : बैलगाडा शर्यत बंदीविरोधात...
वाढीव वीजबिलांबाबत शेतकऱ्यांनी घेतली...मंगरूळपीर, जि. वाशीम : तालुक्यातील कासोळा,...
वऱ्हाडात आता विधान परिषद निवडणुकीचा बार अकोला : विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुक...
सांगलीत एकावन्न हजार शेतकऱ्यांना १४...सांगली : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत...
उस्मानाबाद जिल्ह्यात पीकविम्यावरून...उस्मानाबाद : जिल्हा प्रशासन व पीकविमा कंपनीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव सुरूनाशिक : जिल्ह्यातील बाजार समिऱ्यांमध्ये कांदा...
रत्नागिरीतील १५०३ गावांची पैसेवारी ५०...रत्नागिरी : खरीप हंगामात भातपीक घेणाऱ्या गावातील...
शेतकऱ्यांनो, ऊसतोडी घेऊ नका : पाटीलकऱ्हाड, जि. सातारा : साखर कारखान्यांनी एकरकमी...
जळगावात महाविकासच्या ‘सहकार’ला...जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतून भारतीय जनता...
कापसाला यंदा दर; मात्र उत्पादकतेत मोठी...अकोला : कापसाचा दर वाढल्याने बाजारपेठेत उत्साही...
विठोबा शेतकरी गटाकडून सेंद्रिय...नांदेड : कोरोनाच्या काळात सेंद्रिय पद्धतीने...
अमरावती विभागात १२८९ गावांची पैसेवारी...अमरावती : या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी व...
सरकार आणि साखर कारखानदारांना विरोधात...परभणी : मराठवाड्यातील अनेक कारखान्यांनी यंदा अजून...
सांगली जिल्हा बँक निवडणूक : अठरा...सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी तीन...
शेतकऱ्यांचे ८० लाख रुपये घेऊन...गोवर्धन, जि. नाशिक : गिरणारे येथील एका...
राज्यात दुधाच्या गुणवत्तेबाबत तडजोड...संगमनेर, जि. नगर : राज्यात दुधाच्या शुद्धतेबाबत...
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपचा...जळगाव : जळगाव जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीवर...
परभणीत केवळ ७६७ टन डीएपी शिल्लक परभणी : जिल्ह्यात रब्बी हंगामातील सरासरी खताच्या...
निर्यातक्षम फळनिर्मितीतूनच शेतकऱ्यांची...नागपूर : शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता...