बुलडाणा जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडी

Buldana Zilla Parishad leads Mahavikas Aghadi
Buldana Zilla Parishad leads Mahavikas Aghadi

बुलडाणा ः संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. काँग्रेसच्या मनीषा नितीन पवार अध्यक्ष तर शिवसेनेच्या कमलताई जालिंदर बुधवंत यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. विरोधी भाजपकडून दाखल अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठीचे अर्ज मागे घेतल्याने ही निवड प्रक्रिया बिनविरोध झाली.

या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत अध्यक्ष, उपाध्यक्षपदांवर आपल्या सदस्यांची निवड केली होती. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर मात्र या ठिकाणच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष वेधल्या गेले होते. अपेक्षेप्रमाणे काँग्रेस-राष्ट्र्वादी काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडी जिल्हा परिषदेतही झाली आणि बुधवारी (ता. ८) अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारली.  

अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या मनीषा नितीन पवार, तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या कमलताई जालिंदर बुधवंत यांनी अर्ज दाखल केले होते. तर भाजपतर्फे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी रूपाली अशोक काळपांडे व जयश्री विनोद टिकार यांचे अर्ज दाखल होते. भाजपकडे सत्तेसाठी लागणारे संख्याबळ नसल्याने उमेदवारांचे अर्ज वेळेवर मागे घेण्यात आले. त्यामुळे मनीषा पवार व कमलाताई बुधवंत यांचा अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचा मार्ग सुकर झाला.

मात्र भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी त्यांचे अर्ज शेवटच्या क्षणी मागे घेतल्यामुळे बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसच्या मनीषा नितीन पवार, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या कमलताई जालिंदर बुधवत यांची निवड अविरोध विजयी म्हणून जाहीर घोषित करण्यात आली आहे. 

या जिल्हा परिषदेच्या ५९ पैकी ३५ सदस्यांचे समर्थन या पदाधिकाऱ्यांना मिळाला. यापुढील टप्प्यात आता विषय समित्यांची घोषणा अध्यक्ष करणार आहेत. ही निवड प्रक्रिया उपविभागीय अधिकरी राजेश्‍वर हांडे यांच्या उपस्थितीत झाली.  

विजयाने अनेक गोष्टी झाल्या सुकर या जिल्हा परिषदेत असलेली भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी अनेकदा टिकेचा विषय झाली होती. राज्यात सत्ता आल्यानंतर ही आघाडी टिकेल काय, असे प्रश्‍न उपस्थित केले जात होते. परंतु राष्ट्रवादीने ही आघाडी तोडून महाविकास आघाडीचा धर्म पाळला. त्यामुळे आजच्या निवडीत काँग्रेसचा अध्यक्ष, शिवसेनेचा उपाध्यक्ष बनला. आता महत्त्वाच्या विषय समित्या राष्ट्रवादीच्या सदस्यांना दिल्या जाणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com