बुलडाण्यातील १५ महसूल मंडळांत दुष्काळ जाहीर

बुलडाण्यातील १५ महसूल मंडळांत दुष्काळ जाहीर
बुलडाण्यातील १५ महसूल मंडळांत दुष्काळ जाहीर

बुलडाणा : कमी पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना काही तालुक्यातच दुष्काळ जाहीर झाल्याने नाराजी पसरली होती. याविरुद्ध ठिकठिकाणी आंदोलने झाली. संघटनांनी पात्र असलेल्या महसूल मंडळातही दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. अखेरीस शासनाने १५ महसूल मंडळांचा दुष्काळात समावेश केला आहे. याची घोषणा नुकतीच करण्यात आली.

जिल्ह्यात ३१ ऑक्टोबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार मलकापूर, नांदुरा, खामगाव, शेगाव, संग्रामपूर, लोणार, सिंदखेडराजा व मोताळा या आठ तालुक्यांमध्ये दुष्काळाची घोषणा झाली. ज्या महसुली मंडळांमध्ये जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत तालुक्याच्या सरासरी पर्जन्याच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला, अशा २१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. आता आणखी १५ महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली.

दुष्काळ घोषित झालेल्या तालुक्यातील गावांमध्ये विविध सवलती लागू करण्यात आलेल्या आहेत.  या २४६ गावांतील नागरिकांनाही शासन निर्णयानुसार जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के इतकी सूट, शालेय/ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी टॅंकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावांत शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपांची वीज जोडणी खंडित न करणे या सवलतींचा समावेश आहे. या गावांमध्येही सवलतींच्या अंमलबजावणीची कार्यवाही तातडीने करण्याबाबत संबंधित विभागांना जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत.

नवीन दुष्काळी महसूल मंडळे (तालुकानिहाय) 

बुलडाणा  बुलडाणा, देऊळघाट, पाडळी, रायपूर, धाड
चिखली चिखली, उंद्री, अमडापूर, हातणी, मेरा
मेहकर  मेहकर, हिवरा आश्रम
देऊळगावराजा देऊळगावमही
जळगाव जामोद   जळगाव, जामोद
एकूण गावांची संख्या  २४६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com