बुलडाणा जिल्हा दुष्काळी जाहीर, अकोला प्रतिक्षेत

भाजपमधील खासदार व पालकमंत्र्यांच्या अंतर्गत राजकारणात जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता व शेतकरी वेठीस धरले जात असल्याचा हा परिणाम आहे. वास्तविक सरासरीपेक्षा कितीतरी कमी पर्यजन्यमान झालेल्या अकोट, पातूर तालुक्यांत सर्वप्रथम दुष्काळ जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, नकारात्मक राजकारणामुळे या दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे . -महेश गणगणे, जिल्हाध्यक्ष, युवक काँग्रेस, अकोला लोकसभा
बुलडाणा जिल्हा दुष्काळी जाहीर, अकोला प्रतिक्षेत
बुलडाणा जिल्हा दुष्काळी जाहीर, अकोला प्रतिक्षेत

अकोला : मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण बुलडाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याचे आदेश पुनर्वसनमंत्र्यांना दिले आहेत. मात्र, दुसरीकडे शेजारच्याच अकोला जिल्ह्यात अकोट व पातूर तालुक्याचा दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश करण्याची मागणी असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात अालेले अाहे. यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

मंगळवारी (ता.२०) बुलडाणा जिल्हा संपूर्णत: दुष्काळग्रस्त घोषित करण्याबाबत जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मागणी केली होती.

या हंगामात बुलडाणा जिल्ह्यात सरासरीच्या ६९ टक्केच पाऊस झाला. त्यामुळे पिकांची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती. पावसाचे प्रमाण कमी तसेच दोन पावसांमध्ये मोठा खंड पडल्यामुळे पिकांची उत्पादकता घटली. जलयुक्त शिवाराची कामे मोठ्या प्रमाणात होऊनही कमी पावसामुळे ही कामे भरली नाहीत. परिणामी धरणे तसेच प्रकल्पांमध्ये अत्यंत कमी पाणीसाठा तयार झाला. भूजल पातळीतही घट अाली. या संपूर्ण जिल्ह्याची पैसेवारी ४५ पैसे आहे. जिल्ह्यातील ९० महसूल मंडळांपैकी ७३ महसूल मंडळे हे दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली होती. उर्वरित १७ महसूल मंडळांवर हा एक प्रकारचा अन्यायच झाल्याची भावना तयार झाली होती.

अकोल्याची मागणी कायम अकोला जिल्ह्यात पावसातील खंडामुळे पिकांची उत्पादकता कमालीची घटली. भूजल पातळीत घट अाली. यामुळे जिल्ह्यातील पीक परिस्थिती चांगली राहली नाही. शासनाने अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर अाणि तेल्हारा या पाच तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यात समावेश केला. मात्र, वरील तालुक्यांसारखीच परिस्थिती अकोट व पातूरमध्ये असतानाही हे दोन्ही तालुके वगळलेले अाहेत. या तालुक्यांचा समावेश करून शेतकऱ्यांना दुष्काळी उपाययोजनांचा लाभ दिला जावा, अशी मागणी विविध पक्ष, संघटना, शेतकऱ्यांमधून केली जात अाहे. मात्र, याचा सर्वसमावेशक विचार शासनस्तरावर झालेला नाही. त्यामुळे या दोन तालुक्यांतील हजारो नागरिक दुष्काळी उपाययोजनांपासून वंचित राहिलेले अाहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com