नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
बातम्या
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीच्या ४० टक्क्यांवर पेरण्या
बुलडाणा ः यंदाच्या हंगामात जिल्ह्यात रब्बीसाठी पोषक स्थिती असल्याने पेरण्यांनी वेग घेतला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ६३ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या असून सरासरी ४० टक्के क्षेत्र लागवडीखाली आले आहे. अजूनही पेरण्यांचा वेग कायम असून या महिना अखेर नियोजित क्षेत्र लागवडीखाली येण्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.
बुलडाणा ः यंदाच्या हंगामात जिल्ह्यात रब्बीसाठी पोषक स्थिती असल्याने पेरण्यांनी वेग घेतला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ६३ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या असून सरासरी ४० टक्के क्षेत्र लागवडीखाली आले आहे. अजूनही पेरण्यांचा वेग कायम असून या महिना अखेर नियोजित क्षेत्र लागवडीखाली येण्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.
बुलडाणा जिल्ह्यात हरभऱ्याचे सुमारे ६२ हजार सरासरी लागवड क्षेत्र असून आत्तापर्यंत ४३७०० हेक्टरवर पेरणी झाली. जवळपास ७२ टक्के हरभऱ्याचे क्षेत्र लागवडीखाली आले आहे. गव्हाचे ६६५०३ हेक्टर असून त्यापैकी ११२०३ हेक्टरवर पेरणी झाली. गव्हाची लागवड सरासरीच्या १७ टक्के एवढी आहे.
या रब्बी हंगामात सुमारे एक लाख ५७ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन करण्यात आलेले आहे. पेरण्यांनी या महिन्यात वेग घेतला. पेरण्यांची वाढलेली गती लक्षात घेता या महिनाअखेर मोठे क्षेत्र साध्य होईल, असा अंदाज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात यंदा खरिपात ९० टक्क्यांवर नुकसान झालेले आहे. प्रामुख्याने मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचे अतोनात नुकसान झाले. सोबतच कापसाचे पीकही अपेक्षित येऊ शकलेले नाही.
यामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण मदार आता रब्बीवर लागलेली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात परतीच्या अतिपावसामुळे जमिनीच्या मशागतीला विलंब झाला. त्यामुळे रब्बी हंगामाला सुमारे महिनाभराने विलंब झाला. ज्यांच्याकडे जमीन तयार होती, अशा शेतकऱ्यांनी तातडीने नियोजन केले. उगवलेल्या पिकांना सिंचनासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झालेली आहे. काही ठिकाणी गहू, हरभऱ्याचे पीक महिनाभराचे झालेले आहे. या पिकाला पाण्याच्या पाळ्या देण्यासाठी शेतकरी विजेच्या उपलब्धतेनुसार नियोजन करीत आहेत.
तालुकानिहाय पेरणी | ||
तालुका | लागवड | टक्के |
जळगाव जामोद | १००१ | १० |
संग्रामपूर | ३५२ | १०.१८ |
चिखली | १३६० | ५.३९ |
बुलडाणा | १६६१५ | ६५.८५ |
देऊळगावराजा | २२८३९ | १०७ |
सिंदखेडराजा | ९०९८ | ७२.८८ |
खामगाव | ६४५७ | ५८.५ |
मोताळा | ४३५ | ८.५७ |
एकूण | ६२९५१ | ३९.९० |
- 1 of 1502
- ››