समृद्धीला समांतर बुलेट ट्रेनचा मार्ग 

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालगतच आता अतिवेगवान (हायस्पीड बुलेट ट्रेन) रेल्वे मार्गाचे कामही केले जाणार आहे.
समृद्धीला समांतर बुलेट ट्रेनचा मार्ग  The bullet train route parallel to prosperity
समृद्धीला समांतर बुलेट ट्रेनचा मार्ग  The bullet train route parallel to prosperity

बुलडाणा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालगतच आता अतिवेगवान (हायस्पीड बुलेट ट्रेन) रेल्वे मार्गाचे कामही केले जाणार आहे. यासाठी प्रकल्प हातात घेण्यात आला असून, याचा डीपीआर तयार करण्यासोबतच शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत अडचणी जाणून घेण्यासाठी गुरुवारी (ता.२२) बुलडाण्यात पहिली बैठक झाली. या बैठकीत संभाव्य मार्गाचे सादरीकरण करण्यात आले. बैठकीला रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. नागपूर ते मुंबई मुंबई हे ७३८ किलोमीटरचे अंतर अतिवेगवान रेल्वेमुळे अवघ्या साडेतीन तासात कापणे शक्य होणार आहे. आधीच शासनाने नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचे काम सुरू केलेले आहे. बहुतांश भागात हे काम पूर्ण झाले आहे. या महामार्गाला लागूनच आता दहा जिल्ह्यांतून ही अतिवेगवान बुलेट ट्रेन धावण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने पहिली बैठक बुलडाणा झाली. रेल्वेचे समाज विकास अधिकारी श्याम चौगुले यांनी बैठकीत सादरीकरण केले. लवकरच या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डीपीआर तयार करण्याचे काम सुरू होणार असून, हा अहवाल तयार झाल्यावर तो जागतिक बँकेकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर जागतिक बँकेने मंजूर केल्यावरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या रेल्वे मार्गाचा डीपीआर बनविण्याचे काम देखील सुरू झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. रेल्वेमार्ग जाणाऱ्या दहा जिल्ह्यांत स्थानिक प्रशासन व रेल्वे कमिटी या बद्दल काम करणार आहे. 

दहा जिल्ह्यात होईल जमीन संपादन  या रेल्वेचा दहा जिल्ह्यांत २८ तालुक्यांतील ३८७ गाव शिवारातून मार्ग राहणार आहे. २५० ते ३५० किलोमीटर प्रतितास असा या रेल्वेचा वेग राहणार आहे. ७५० प्रवासी क्षमता राहील. समृद्धी महामार्गाला समांतर पातळीवर ५८ फूट अर्थात १९ मीटर जमीन संपादित केली जाईल. या रेल्वेला ज्या १४ ठिकाणी थांबा आहे, तेथे साधारणत: २५ मीटरपर्यंतच जमीन संपादित करावी लागेल. रेल्वे मार्गासाठी बुलडाणा जिल्ह्यात १५२.१० हेक्टर तर वाशीममध्ये १७०.४६ हेक्टर, नागपूर ५९.०३, वर्धा १०६.६९, अमरावती १२८.७७, जालना ७४.९९, औरंगाबाद १६७.९६, अहमदनगर ५१.५०, नाशिक १८९.५८ आणि ठाणे जिल्ह्यात १४४.५३ हेक्टर जमीन संपादित केली जाईल. 

प्रतिक्रिया

शेतकऱ्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला आणि शेतकऱ्यांना विश्‍वासात घेऊन संपादन केले तरच शेतकरी प्रशासनाला सहकार्य करतील. अन्यथा समृद्धी महामार्ग तयार होत असताना सुरुवातीला जसा विरोध झाला, त्याची पुनरावृत्ती होऊ शकते. याची प्रशासनाने दखल घेतली पाहिजे.  -नितीन पिसे, समृद्धी महामार्ग, संघर्ष समिती, बुलडाणा   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com