Agriculture news in marathi The bullet train route parallel to prosperity | Page 3 ||| Agrowon

समृद्धीला समांतर बुलेट ट्रेनचा मार्ग 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 जुलै 2021

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालगतच आता अतिवेगवान (हायस्पीड बुलेट ट्रेन) रेल्वे मार्गाचे कामही केले जाणार आहे.

बुलडाणा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालगतच आता अतिवेगवान (हायस्पीड बुलेट ट्रेन) रेल्वे मार्गाचे कामही केले जाणार आहे. यासाठी प्रकल्प हातात घेण्यात आला असून, याचा डीपीआर तयार करण्यासोबतच शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत अडचणी जाणून घेण्यासाठी गुरुवारी (ता.२२) बुलडाण्यात पहिली बैठक झाली.

या बैठकीत संभाव्य मार्गाचे सादरीकरण करण्यात आले. बैठकीला रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. नागपूर ते मुंबई मुंबई हे ७३८ किलोमीटरचे अंतर अतिवेगवान रेल्वेमुळे अवघ्या साडेतीन तासात कापणे शक्य होणार आहे. आधीच शासनाने नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचे काम सुरू केलेले आहे. बहुतांश भागात हे काम पूर्ण झाले आहे.

या महामार्गाला लागूनच आता दहा जिल्ह्यांतून ही अतिवेगवान बुलेट ट्रेन धावण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने पहिली बैठक बुलडाणा झाली. रेल्वेचे समाज विकास अधिकारी श्याम चौगुले यांनी बैठकीत सादरीकरण केले. लवकरच या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डीपीआर तयार करण्याचे काम सुरू होणार असून, हा अहवाल तयार झाल्यावर तो जागतिक बँकेकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर जागतिक बँकेने मंजूर केल्यावरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या रेल्वे मार्गाचा डीपीआर बनविण्याचे काम देखील सुरू झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. रेल्वेमार्ग जाणाऱ्या दहा जिल्ह्यांत स्थानिक प्रशासन व रेल्वे कमिटी या बद्दल काम करणार आहे. 

दहा जिल्ह्यात होईल जमीन संपादन 
या रेल्वेचा दहा जिल्ह्यांत २८ तालुक्यांतील ३८७ गाव शिवारातून मार्ग राहणार आहे. २५० ते ३५० किलोमीटर प्रतितास असा या रेल्वेचा वेग राहणार आहे. ७५० प्रवासी क्षमता राहील. समृद्धी महामार्गाला समांतर पातळीवर ५८ फूट अर्थात १९ मीटर जमीन संपादित केली जाईल. या रेल्वेला ज्या १४ ठिकाणी थांबा आहे, तेथे साधारणत: २५ मीटरपर्यंतच जमीन संपादित करावी लागेल. रेल्वे मार्गासाठी बुलडाणा जिल्ह्यात १५२.१० हेक्टर तर वाशीममध्ये १७०.४६ हेक्टर, नागपूर ५९.०३, वर्धा १०६.६९, अमरावती १२८.७७, जालना ७४.९९, औरंगाबाद १६७.९६, अहमदनगर ५१.५०, नाशिक १८९.५८ आणि ठाणे जिल्ह्यात १४४.५३ हेक्टर जमीन संपादित केली जाईल. 

प्रतिक्रिया

शेतकऱ्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला आणि शेतकऱ्यांना विश्‍वासात घेऊन संपादन केले तरच शेतकरी प्रशासनाला सहकार्य करतील. अन्यथा समृद्धी महामार्ग तयार होत असताना सुरुवातीला जसा विरोध झाला, त्याची पुनरावृत्ती होऊ शकते. याची प्रशासनाने दखल घेतली पाहिजे. 
-नितीन पिसे, समृद्धी महामार्ग, संघर्ष समिती, बुलडाणा 
 


इतर ताज्या घडामोडी
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...
पीकविमा योजना शासनाने चालवावी : भारत...अकोला : हजारो कोटी रुपये कमाई करणाऱ्या...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...
कृषी कायद्यांबाबतचा अहवाल खुला करावा :...अकोला : केंद्र सरकारच्या कृषिविषयक कायद्यांना...
सागर खोतकडून ‘स्वाभिमानी’च्या...नेर्ले, जि. सांगली : आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा...
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१...जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत...
खडसे, महाजन यांना सहकारात एकत्र...जळगाव : राज्याच्या राजकारणात माजी मंत्री एकनाथ...
फुंडकर फळबाग योजनेत शेतकऱ्यांचे ७५ लाख...नांदेड : रोजगार हमी योजनेत पात्र ठरु शकत नाहीत...
नाशिक बाजार समिती गैरव्यवहार प्रकरणी...नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ ऑक्टोबर...
जमनालाल बजाज पुरस्कार बी. बी. ठोंबरे...लातूर : कौन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिसकडून...
अज्ञाताने फवारले कांद्यावर तणनाशक; ...भुसावळ, जि. जळगाव : तळवेल (ता. भुसावळ) येथील...
पंजशीरवर तालिबानचा ताबा; गर्व्हनर...काबूल : अफगाणिस्तानातील सर्वात कठिण मानला...
शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या संपूर्ण...अकोला : शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या पायातील सर्व...
काथ्या उद्योगवृद्धीसाठी सर्वतोपरी...सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात काथ्या उद्योग...
चांदूर बाजार तालुक्यात ४२ टक्‍क्‍यांनी...अमरावती : शेती कामाकरिता बैलांचा वापर होत...
शेतकऱ्यांची लूट थांबली पाहिजे : शरद पवारजुन्नर, जि. पुणे ः शेतीमालाला चांगला भाव देण्याची...
पाच मंगळवार शेती कामांना ब्रेक;...आर्णी, जि. यवतमाळ : ८५ वर्षांपूर्वी आलेल्या...
संत्रा उत्पादकांना शासनाने वाऱ्यावर...अमरावती : विदर्भातील मुख्य पीक असलेल्या संत्रा...
नागपूर जिल्हा परिषदेत ‘फाइल ट्रॅकर’नागपूर : ‘सरकारी काम आणि महिनाभर थांब’, असाच...
आंबा, काजू विम्यासाठी जुने निकष लागू...सिंधुदुर्गनगरी ः फळपीक विमा योजनेचे बदललेले निकष...