Agriculture news in marathi Bullion kharif crop insurance Tolvatolvi revealed on the question | Agrowon

बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर टोलवाटोलवी उघड 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 जुलै 2021

बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप हंगामात झालेल्या नुकसानीपोटी पीकविमा दिला जावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (ता.२६) कृषी आयुक्तालयासमोर उपोषणाचा इशारा दिला.

बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप हंगामात झालेल्या नुकसानीपोटी पीकविमा दिला जावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (ता.२६) कृषी आयुक्तालयासमोर उपोषणाचा इशारा दिला. या प्रकरणी कृषी आयुक्तालयाने संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांना पत्र देत विमा कंपनीला निर्देश दिल्याचे सांगितले. मात्र, कंपनीने निवेदनात नमूद तक्रारीप्रमाणे नुकसान भरपाई देता येत नसल्याचे निदर्शनास आणून दिल्याची बाब या पत्रात स्पष्ट करण्यात आली आहे. 

गेल्या हंगामात जिल्ह्यातील २ लाख ९६ हजार २३१ शेतकरी सहभागी झाले होते. २ लाख २७ हजार हेक्टरचा विमा त्यांनी उतरविला होता. यापोटी सुमारे २२ कोटी २२ लाख रुपये विमा हप्ताही शेतकऱ्यांनी भरला होता. या हंगामात आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते, असे असतानाही केवळ २६ हजार २१८ शेतकऱ्यांसाठी १७ कोटी ९२ लाख रुपये भरपाई विमा कंपनीकडून देण्यात आली होती.

हजारो सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एक दमडीही मिळालेली नाही. वास्तविक जिल्ह्याची पैसेवारीही कमी निघालेली होती. त्यामुळे नुकसानभरपाई दिली जावी यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर संघटनांनी सातत्याने आंदोलने केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हा मुद्दा आता थेट कृषी आयुक्तांपर्यंत पोचवून उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या प्रकरणी कृषी आयुक्तालयाने डिक्कर यांना उलट टपाली पत्र दिले असून, उपोषण न करण्याची विनंती केली. यासाठी विमा कंपनीने दिलेले स्पष्टीकरण मांडले आहे. 

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई देण्यासाठी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे विमा कंपनीने ग्राह्य धरून जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने नुकसान भरपाई देण्याबाबत कार्यवाही करण्यासाठी संबंधित विमा कंपनीला निर्देश दिल्याचे म्हटले. परंतु केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नुकसान भरपाई देता येत नसल्याचे विमा कंपनीने निदर्शनास आणून दिले आहे. पंतप्रधान पीकविमा योजना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना व शासन निर्णयातील तरतुदींच्या आधारे राज्यात राबविण्यात येत आहे. ही योजना केंद्राची असल्याने त्याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे असेही कृषी संचालकांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

ती बैठकही झाली होती रद्द 
कृषिमंत्री दादा भुसे यांच्या निर्देशानुसार २२ जुलैला मंत्रालयात या प्रश्नावर चर्चेसाठी तातडीची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीकडे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, ही बैठकच एका पत्राद्वारे रद्द करण्यात आल्याचे संबंधितांना कळविण्यात आले. 

बुलडाण्यातील पीकविम्याची स्थिती 

  • २ लाख ९६ हजार २३१ शेतकरी सहभागी 
  • २ लाख २७ हजार हेक्टरचा विमा उतरविला 
  • सुमारे २२ कोटी २२ लाख रुपये विमा हप्ताही भरला 
  • हंगामात आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान 
  • केवळ २६ हजार २१८ शेतकऱ्यांसाठी १७ कोटी ९२ लाख रुपये भरपाई मिळाली 

इतर बातम्या
‘अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना  हेक्टरी...परभणी : अतिवृष्टीमुळे जमिनी खरडून गेल्या आहेत....
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
ज्वारी पेरली तर खरी,  पण वाचवायची कशी? अकोला : गेल्या काही वर्षांत सातत्याने ज्वारीचे...
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
पुरंदरमध्ये लवकरच प्रॉपर्टी कार्ड : ...गराडे, जि. पुणे : स्वामित्व योजना...
आमच्या गावाला ग्रामपंचायत द्या...गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील रवी व मुल्लुरचक या...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
पुणे जिल्ह्यात तुरळक  ठिकाणी हलक्या...पुणे : दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण...
एकरकमी एफआरपीसाठी  भारतीय किसान संघाचे...पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर...
नगरला कांदा दरात  चढ-उतार सुरूच नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी  कुरुंदवाडमध्ये...कोल्हापूर : महापूर ओसरून दीड महिना झाला असून,...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...
अखेर ‘चोसाका’ला मिळाली नवसंजीवनीचोपडा, जि. जळगाव  : ‘‘चोपडा शेतकरी सहकारी...
पूर्व विदर्भात पावसामुळे हाहाकार नागपूर : पूर्व विदर्भातील भंडारा आणि नागपूर...
पोषक आहाराबद्दल जागरूकता महत्त्वाची :...सोलापूर ः ‘‘आपल्या सर्वांसाठी पोषक आहार आवश्यक...