agriculture news in Marathi bullishness of soybean continue Maharashtra | Page 3 ||| Agrowon

सोयाबीनमधील तेजी कायम 

अनिल जाधव
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

सोयाबीनने प्लॅंट दरासह बाजार समित्यांमध्येही पाच हजारांचा टप्पा पार केला आहे. वाशीम बाजार समितीत ५२११, लातूर ५१०० तर मध्य प्रदेशातील निमच येथे ५०५०, बाडनगर ५३०० रुपये दर मिळाला.

पुणे ः सोयाबीनने प्लॅंट दरासह बाजार समित्यांमध्येही पाच हजारांचा टप्पा पार केला आहे. वाशीम बाजार समितीत ५२११, लातूर ५१०० तर मध्य प्रदेशातील निमच येथे ५०५०, बाडनगर ५३०० रुपये दर मिळाला. बाजारात मालाचा तुटवडा, सोयमिलची वाढलेली निर्यात यामुळे दर पुढील दीड ते दोन महिन्यांत ५४०० रुपयांवर पोचतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. 

जागतिक पातळीवर यंदा सोयाबीनचा तुटवडा असल्याने दर तेजीत आहेत. ‘सीबॉट’वर दर वाढून १४०० डॉलर प्रतिबुशेल्सवर पुन्हा पोचले आहेत. तसेच ‘एनसीडीईएक्स’वर मार्चचे सौदे ५००० रुपयांनी झाले. मात्र सध्या देशात प्लॅंटचे दर हे ५२५० रुपयांवर पोचले आहेत. त्यामुळे सोयाबीन दरातील तेजी कायम असून पुढील काळात आणखी भाव खाईल अशी शक्यता आहे. 

‘‘सोयाबीनची बाजारात आवक झाल्यानंतर थोडाच माल शिल्लक आहे. पुढील हंगामातील सोयाबीन येण्याला ६ महिन्यांचा कालावधी आहे. या काळात चांगल्या मालाचा मोठा तुटवडा जाणवेल. त्यामुळे दरात वाढ होईल. पुढील दीड ते दोन महिन्यांत सोयाबीनचे दर सध्याच्या पातळीवरून २०० ते २५० रुपयांनी वाढून ५२५० ते ५४०० रुपयांचा टप्पा गाठतील,’’ असा अंदाज शेतमाल बाजार विश्‍लेषक दिनेश सोमाणी यांनी व्यक्त केला. 

दरवाढीला पूरक घटक 

  • ‘एनसीडीईएक्स’वर मार्चच्या डिलेवरीसाठी ५००० रुपयांनी सौदे 
  • मूलभूत घटक अद्यापही मजबूत 
  • पुढील काळात तेजीत कायम राहणार 
  • आत्तापर्यंत ६५ लाख टन सोयाबीन खेरदी झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले 
  • ही खरेदी गेल्यावर्षीच्या तुलनेत १० लाख टनांनी अधिक 
  • फ्यूचर सौद्यांपेक्षा प्लॅंट दर अधीक 
  • पुढील दीड ते दोन महिन्यांत ५४०० चा टप्पा गाठण्याची शक्यता 

विक्रमी सोयामील निर्यात शक्य 
सोयामीलची यंदा विक्रमी निर्यात होण्याचा अंदाज आहे. जागतिक पातळीवर भारतीय सोयामीलला मोठी मागणी असते. यंदा तब्बल १८ लाख टन सोयामील निर्यात होण्याची शक्यता निर्यातदार सूत्रांनी व्यक्त केली आहे. गेल्यावर्षी ८.५ लाख टन सोयामीलची निर्यात झाली होती. यंदा सोयामील निर्यात वाढीच्या परिणामी सोयाबीन दराला आधार मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातही सोयाबीन दर आणखी तेजीत राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. 

प्लॅंट रेटही वाढले
देशभरातील बाजार समित्यांमध्येही सोयाबीन ४२०० ते ५२२१ रुपयाने विकले जात आहे. तर प्लॅंटचे दर हे ५१०० ते ५२५० रुपये आहेत. ‘एनसीडीईएक्स’वर सोयाबीनचे मार्चचे सौदे ५००० रुपयाने होत असताना प्लॅंटचे दर हे १०० ते २५० रुपयांनी अधीक आहेत. म्हणजेच बाजारात सोयाबीनचा तुटवडा असून दर आणखी वाढण्याचे संकेत आहेत. 

प्रतिक्रिया
आत्तापर्यंत बाजारात ६५ लाख टन माल खरेदी होऊन थोडाच शिल्लक आहे. तसेच सोयामीलची विक्रमी १८ लाख टन निर्यात होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर तेजीत असून पुढील दीड ते दोन महिन्यांत सध्याच्या दरात आणखी २०० ते २५० रुपयांनी वाढतील. पुढील हंगामात अद्याप सहा महिन्यांचा कालावधी असल्याने येणाऱ्या काळात सोयाबीन आणखी भाव खाणार हे निश्‍चित आहे. 
- दिनेश सोमाणी, शेतमाल बाजार विश्‍लेषक 


इतर अॅग्रोमनी
तेलबिया उत्पादनात वाढ वॉशिंग्टन ः जागतिक तेलबिया उत्पादनात फेब्रुवारी...
सांगली बाजार समितीत हळदीची आवक वाढलीसांगली ः  कोरोना विषाणूचा वाढता...
सरकारी आकड्यांपेक्षा हरभरा उत्पादनात घट यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच पिकांना बदलत्या...
देशात साखर उत्पादनात ४० लाख टनांनी वाढलेकोल्हापूर : देशातील साखर कारखान्यांनी...
केंद्रीय गोदाम महामंडळाची क्षमता अनेक...नवी दिल्ली ः केंद्रीय गोदाम महामंडळाची क्षमता...
पाकिस्तानची भारतीय कापसाला पसंती जळगाव ः पाकिस्तान कापसासाठी भारताच्या दारात...
हरभरा बाजारात सुधाराची चिन्हे पुणे ः बाजारात हरभरा आवक सुरू झाली आहे....
बाजारात तूर खातेय भाव; वाढ कायम पुणे ः इतर कडधान्य पिकांसह तूर उत्पादनातही घट...
हळदीला दराचा ‘रंग’ पुणे ः हळद उत्पादनात घट झाल्याने यंदा हळदीचे दर...
अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन नवी दिल्ली ः देशात यंदा अन्नधान्याचे विक्रमी...
राष्ट्रीय खाद्यतेल मिशनचा यंदाही चकवापुणे : राष्ट्रीय खाद्यतेल मिशनची यंदाही घोषणा न...
सोयाबीनमधील तेजी कायम पुणे ः सोयाबीनने प्लॅंट दरासह बाजार...
हरभरा बाजाराला ‘नाफेड’चा टेकू पुणे ः नाफेडने राज्यनिहाय खरेदीचे उद्दिष्ट जाहीर...
कापसाचा तुटवडा जाणवू लागला जळगाव : देशात सूतगिरण्यांसमोर कापूसटंचाई तयार...
देशातील हरभरा उत्पादनात घट होण्याची...नवी दिल्ली : यंदाच्या हंगामात देशातील हरभरा...
कोल्हापुरी गुळाला गुजरातेत आव्हान;...कोल्हापूर : यंदा कोल्हापुरी गुळाला गुजरातमधील...
भारतात यंदा ३६० लाख कापूस गाठींचे...मुंबई : भारतात यंदा ३६० लाख गाठींचे (१ गाठ = १७०...
प्रोजेक्ट रिपोर्ट, लायसन्ससाठी यापुढे...पुणे : केंद्र शासनाच्या कृषिविषयक योजनांचा लाभ...
देशात तांदळाचे विक्रमी उत्पादन कोल्हापूर : देशात यंदा तांदळाचे विक्रमी उत्पादन...
बाजारात हरभराही खाणार भाव हरभरा डाळ आणि बेसनला स्नॅक्स, प्रक्रिया उद्योग,...