बाळापूर तालुक्यात उडतोय बैलांच्या शर्यतीचा धुरळा

बाळापूर तालुक्यातीलव्याळा, बटवाडी, रिधोरा येथे नुकतेच शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते.
Bullock cart competition in Balapur
Bullock cart competition in Balapur

बाळापूर, जि. अकोला : सर्वोच्च न्यायालयाने बैलांच्या शर्यतीवरील बंदी हटवल्यानंतर तालुक्यात शर्यत प्रेमींच्या आनंदाला उधाण आले आहे. ग्रामीण अर्थकारणाचा महत्त्वाचा भाग असलेल्या बैलांच्या शर्यतीमुळे सर्वत्र पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण असून, बाळापूर तालुक्यात शंकरपटाचा (बैलाची शर्यत) धुरळा उडत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

तालुक्यात व्याळा, बटवाडी, रिधोरा येथे नुकतेच शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर संपूर्ण तालुक्यातील गावांमध्येही शर्यत होत आहे. शंकरपटाची ही शर्यत सुरू झाल्यामुळे तालुक्यात पटाच्या बैलांच्या किमतीतही वाढ दिसू लागली आहे. बैलांची विक्री करण्यासाठी शेतकरी आता योग्य बाजार शोधू लागले आहेत. ग्रामीण भागात शंकरपट अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अकोल्यातील बाळापूर नाका येथील वारकरी नामक शेतकऱ्याच्या बैलजोडीने रिधोरा येथील शर्यतीत कमाल करून दाखवली होती. बैलाने शर्यतीत केलेल्या कामगिरीचे शंकरपट प्रेमींमध्ये आकर्षण होते. तर बटवाडी येथील शर्यतीतही याच बैलांनी दुसरा क्रमांक पटकावला होता.  शंकरपट प्रेमी व बैलांचे शौकीन असलेल्यांनी बैल खरेदी-विक्री सुरू केली आहे. जिल्ह्याच्या विविध भागांत भरणाऱ्या बैल बाजारात शर्यतीच्या बैलांची मागणी वाढली आहे. या बैलाच्या खरेदीसाठी लाखो रुपये बैल प्रेमींकडून मोजले जात आहेत. त्यामुळे बैलाची विक्री लाखो रुपयांना होत आहे. याबरोबरच शर्यतीसाठी बैलांची खरेदी करताना विशिष्ट जातीच्या बैलांची मागणी शर्यत प्रेमींकडून केली जात आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com