ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा तपासणार

दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध संघटनांनी केलेल्या मागण्या सोमवारी (ता. २१) साखर कारखान्यांच्या समोर मांडण्यात आल्या. या मागण्यांचा अभ्यास तसेच उत्पादकांवरील बोजा तपासून हंगाम सुरू होण्यापूर्वी तोडगा काढण्याची भूमिका साखर संघाने घेतली आहे. संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी राज्यातील कारखान्यांसोबत आज संवाद साधला.
The burden on the growers will be checked while fixing the cane cutting rate
The burden on the growers will be checked while fixing the cane cutting rate

पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध संघटनांनी केलेल्या मागण्या सोमवारी (ता. २१) साखर कारखान्यांच्या समोर मांडण्यात आल्या. या मागण्यांचा अभ्यास तसेच उत्पादकांवरील बोजा तपासून हंगाम सुरू होण्यापूर्वी तोडगा काढण्याची भूमिका साखर संघाने घेतली आहे. संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी राज्यातील कारखान्यांसोबत आज संवाद साधला.

कामगारांच्या मागण्यांबाबत यापूर्वी साखर संघ व कामगार प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली होती. कोविड १९ मुळे राज्यातील साखर कारखाने यंदा संकटात आहेत. त्यामुळे ऊसतोडणी कामगारांनी जास्त मुद्दा न ताणता सहकार्याची भावना ठेवावी, असे मत संघाचे आहे.

दरम्यान, ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत झालेला तिढा सोडविण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडून कामगार प्रतिनिधींना लवकरच चर्चेस बोलवले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील यांनी दिली.

“ऊसतोडणी कामगारांची भूमिका आम्ही यापूर्वीच श्री. पवार यांच्यासमोर मांडली आहे. ते या समस्येबाबत सकारात्मक पावले टाकत आहेत. या मागण्या तेच योग्य प्रकारे सोडवू शकतील, असे कामगार वर्गाला वाटते. त्यामुळे इतरांची मध्यस्थी आम्हाला नको आहे. पवार यांनीही आमची भावना समजून घेत आम्हाला पुन्हा चर्चेला बोलविण्याचे ठरविले आहे,” असे थोरे यांनी स्पष्ट केले.

ऊस तोडणी कामगारांच्या समस्येचा तिढा लवकर सुटल्यास १५ ऑक्टोबरपासून तोडणी सुरू करता येईल, असे ऊसतोडणी कामगार संघटना तथा संघर्ष समितीच्या सुशीलाताई मोराळे, महाराष्ट्र श्रमिक ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे अध्यक्ष जीवन राठोड यांच्यासह थोरे यांचेही मत आहे.

“कोविड १९ ची समस्या कारखान्यांसमोर असली तरी तोडणी कामगार देखील अडचणीत आहेत. त्यामुळे आम्हाला पाच लाखाचा विमा हवा द्यावा. तसेच मजुरीमध्ये दुप्पट वाढ करावी आहे,” असे ऊस तोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियनचे म्हणणे आहे.  

राज्यातील ऊस तोडणी कामगारांबाबत सात-आठ संघटनांकडून साखर संघाकडे निवेदने, मागण्या आल्या आहेत. हे मुद्दे आता साखर कारखान्यांसमोर आम्ही ठेवले आहेत. तोडगा काढताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर पडणारा बोजा देखील तपासला जाणार आहे. या मागण्यांबाबत आता कारखानदारीतील जाणकार आधी अभ्यास करतील. त्यानंतर लवादाकडे मुद्दा जाईल. यानंतरही तोडगा न निघाल्यास माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे असेल. — श्रीराम शेटे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com