agriculture news in Marathi burevy cyclone became weak Maharashtra | Agrowon

बुरेवी चक्रीवादळ निवळू लागले; थंडी वाढली 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 5 डिसेंबर 2020

बुरेवी चक्रीवादळ तमिळनाडू व आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवरून जमिनीवर आल्यानंतर हळूहळू तीव्रता कमी होऊ लागली आहे.

पुणे ः बुरेवी चक्रीवादळ तमिळनाडू व आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवरून जमिनीवर आल्यानंतर हळूहळू तीव्रता कमी होऊ लागली आहे. शुक्रवारी (ता. ४) या चक्रीवादळाचे खोल कमी तीव्र दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर झाले. हे चक्रीवादळ पश्‍चिम वायव्य भागाकडे सरकत असून, गल्फ व मन्नार आणि रामानाथापुरमच्या किनारपट्टीच्या भागाजवळ शांत होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला आहे. 

तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळच्या भागांत धुमाकूळ घातल्यानंतर बुरेवी चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊ लागल्याने वाऱ्याचा वेग कमी होऊ लागला आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील लक्षद्वीप, केरळ, कन्याकुमारी, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या भागांत वादळी वाऱ्यांसह, मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. या चक्रीवादळाची तीव्रता आज (ता. ५) आणखी कमी होणार असून, उद्या आणखी प्रभाव कमी होणार आहे. शुक्रवारी (ता. ४) हे चक्रीवादळ रामानाथापूरमपासून नैर्ऋत्य भागात ४० किलोमीटर अंतरावर होते. पाम्बनपासून पश्‍चिम दक्षिण भागाकडे ७० किलोमीटर, तर कन्याकुमारीपासून ईशान्य भागाकडे १६० किलोमीटर अंतरावर होते. 

थंडी वाढली 
मध्य महाराष्ट्रासह, मराठवाडा व विदर्भात काही भागांत थंड वारे वाहत असल्याने किमान तापमानात घट झाली आहे. त्यामुळे मराठवाडा व विदर्भातील अनेक भागात थंडी वाढली आहे. शुक्रवारी (ता.४) सकाळी आठ वाजेपर्यंत मराठवाड्यातील परभणी कृषी विद्यापीठ येथे ९.४ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली. 

चक्रीवादळासाठी पुन्हा पोषक वातावरण 
गेल्या काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची साखळी सुरूच आहे. बुरेवी हे चक्रीवादळ निवळत असताना पुन्हा दक्षिण अंदमान समुद्र व मलाय पेनिनसुलाजवळा पुन्हा चक्रीवादळासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. 

शुक्रवारी (ता. ४) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः 
मुंबई (सांताक्रूझ) १९.० (-१), ठाणे २४, अलिबाग १९.४, रत्नागिरी २०.२ (-१), डहाणू २०.४ (१), पुणे ११.९ (-१), जळगाव १३.६ (१), कोल्हापूर १७.२ (१), महाबळेश्‍वर १३.४ (-१), मालेगाव १४ (१), नाशिक १४.१ (२), निफाड १०.६., सांगली १५.२ (-१), सातारा १२.९ (-२), सोलापूर १४.५ (-२), औरंगाबाद १२.८, परभणी ११.१ (-३), परभणी कृषी विद्यापीठ ९.४, नांदेड १४, उस्मानाबाद १५.१ (१), अकोला १३.१ (-२), अमरावती १५ (-१), बुलडाणा १४.४ (१), चंद्रपूर १६.४ (२), गोंदिया १०.६ (-३), नागपूर १२.१ (-१), वर्धा १२.४ (-२), यवतमाळ १३ (-२). 
 


इतर अॅग्रो विशेष
‘कनेक्शन कट’चे कारस्थान!बिलाची थकीत रक्कम न भरल्यास आता थेट वीजतोडणीची (...
कापसाचा शिल्लक साठा बाहेर पाठवा कोरोना संक्रमण काळातील सुरुवातीचे तीन-चार महिने...
शेतकरी मागण्यांवर ठाम; ट्रॅक्टर रॅलीही...नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्‍टर...
बर्ड फ्लू नुकसानग्रस्त पोल्ट्री...नागपूर ः राज्यात ११ जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा...
एक लाख शेतकऱ्यांची तूर विक्रीसाठी...अकोला ः राज्यात या हंगामात उत्पादित तूर खरेदीला...
कापूस उत्पादकतावाढीसाठी ‘सीआयसीआर’चा ॲ...नागपूर ः जगाच्या तुलनेत भारताची आणि त्यातही...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष हंगामास उशीरसांगली ः जिल्ह्यात अगदी क्वचितच आगाप छाटणी...
आजरा घनसाळसह तूरडाळ, घेवडा मिळणार...कोल्हापूर : पारंपरिक विक्री व्यवस्थेच्या पलीकडे...
थंडीत चढ-उतार सुरुच पुणे ः हिमालय आणि पश्चिम बंगालच्या परिसरात कमी...
खांबापासून ३० मीटरच्या आतील कृषिपंपांना...पुणे ः राज्यातील शेतकऱ्यांना कृषिपंपांसाठी...
गव्यांच्या कळपाकडून केळी बागांचे नुकसानसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील विलवडे मळावाडी (ता....
भाजीपाला, कणगर, दुधातून उंचावले...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता.वेंगुर्ला)...
केंद्र सरकारकडून कृषी कायदांना...नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी...
ग्रामसभांना ३१ मार्चपर्यंत परवानगी...अकोला : राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये कोविड-१९च्या...
राज्यात साडेचार लाख क्‍विंटल मका...औरंगाबाद : बंद पडलेली मका खरेदी जवळपास एका...
शेतकऱ्यांच्या भूमिकेवर न्यायालयाची...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांवरून निर्माण झालेल्या...
तूर खरेदीसाठी जिल्हानिहाय उत्पादकता...परभणी ः केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत...
कांदा निर्यातदारांसाठी आता ‘ओनियन नेट’ नागपूर : कांदा उत्पादनाच्या बाबतीत जागतीक स्तरावर...
खानदेशात गारठा वाढला पुणे ः उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट आली...
पावसाच्या पाण्यावर फुलवलेली दर्जेदार...निमगाव घाणा (ता. जि. नगर) येथील रामदास रघुनाथ...