Agriculture news in marathi, Burn sugarcane in Malegaon taluka | Page 2 ||| Agrowon

मालेगाव तालुक्यात ऊस जळून खाक

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021

कळवाडी, ता. मालेगाव : तालुक्यातील नरडाणे येथे उसाच्या शेतात विजेच्या तारेमुळे आग लागली. त्यात तीन शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा ऊस व ठिबक सिंचनाचे साहित्य जळून खाक झाले.

कळवाडी, ता. मालेगाव : तालुक्यातील नरडाणे येथे उसाच्या शेतात विजेच्या तारेमुळे आग लागली. त्यात तीन शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा ऊस व ठिबक सिंचनाचे साहित्य जळून खाक झाले.

शेतकरी दशरथ बारकू बच्छाव, नयना घनश्याम परदेशी, प्रयागबाई शांताराम सरावत या शेतकऱ्यांच्या शेतातील काढणीला आलेल्या उसाच्या शेतात विजेच्या तारांच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यात लाखो रुपयांचा ऊस जळून खाक झाला. नरडाणे परिसरात वाऱ्‍यासारखी पसरली. आग आटोक्यात आणण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. तोपर्यंत साधारणतः चार ते पाच एकर ऊस जळून खाक झाला. महिन्याभरात ऊस काढणीला येणार होता; तोच आग लागून उसाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या सोबतच ठिबक सिंचनाचे पूर्ण साहित्य जळाले.

घटनास्थळी वीज वितरणच्या अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, येथील सरपंच बाळनाथ सरावत यांनी त्वरित पंचनामा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार तलाठी बनसोड, ग्रामसेवक पी. जी. पांढरे व कृषी अधिकाऱ्यांनी पंच दयाराम सरावत, दादाजी बच्छाव, बाळनाथ सरावत, विलाससिंग परदेशी, पोलिस पाटील विशाखा बोराळे यांच्या उपस्थितीत पंचनामा केला. त्यानुसार दशरथ बच्छाव यांचे दोन लाख ५० हजार, नयना परदेशी यांचे ३ लाख ५० हजार, प्रयागबाई सरावत यांचे ९ लाख ५० हजार इतके नुकसान झाल्याचे समजते. 

  नुकसानभरपाईची मागणी 

शासनाने नुकसानभरपाई पीडित शेतकऱ्यांना त्वरित द्यावी, अशी मागणी सरपंच व पंचकमिटी यांनी केली. वीज कंपनीने लोंबकळणाऱ्या विजेच्या तारांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली.
 


इतर बातम्या
पुसदमध्ये ५००० क्विंटल कापसाचीच खरेदीआरेगाव, जि. यवतमाळ : यंदा सुरवातीपासूनच कापसाला...
धुळे : सोयाबीन बीजोत्पादनात सहभाग...धुळे : ‘‘उन्हाळी हंगाम २०२१-२२ मध्ये महाबीज...
नाशिकः २०२४ पर्यंत प्रति दिन,प्रति...नाशिकः ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत ‘हर घर नल से जल’...
खानदेशात गहू पेरणीला आला वेग जळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस काहीसे कोरडे...
नांदेड जिल्ह्यात साडेतीन लाख शेतकरी...नांदेड : ई-पीक पाहणी प्रकल्पातंर्गत पीक पेरा...
नांदेडमध्ये सोयाबीनला साडेसहा हजारांचा...नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत...
तुर्कांबाद खराडीत करारावर बटाटा...औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर तालुक्‍यातील...
शेतकऱ्यांनो एकरकमी भरा अर्धेच वीजबिल ः...नगर : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे धोरण...
राज्याच्या किमान तापमानात घट पुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर आकाश...
शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे -...लातूर ः आज देशात गहू, तांदूळ, मका आणि साखर अधिकची...
शिंदीच्या झाडांचे आता जिओ टॅगिंग  नीरा...नागपूर ः राज्य शासनाने नीरा देणाऱ्या शिंदीच्या...
कंटेनर भाड्यात पाच पट वाढ नागपूर ः टाळेबंदीमुळे अमेरिका आणि युरोपियन देशात...
विमा योजनेकडे ७० टक्के शेतकऱ्यांनी...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कापड उद्योगाला खुपतोय कापसाचा दर पुणे : तमिळनाडूतील राजकीय पक्ष तसेच कापड...
काँग्रेसचे सतेज पाटील, भाजपचे अमरिश...मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या ६ जागा...
नाशिकमध्ये द्राक्ष परिषद घेणार : राजू...नाशिक : द्राक्ष पिकात शेतकरी कष्टातून उत्पादन घेत...
नगर जिल्ह्यात रब्बी पेरणीचा टक्का कमीचनगर ः जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला अजूनही फारसा...
ई-पीक पाहणीचा पहिला टप्पा यशस्वीपुणेः देशातील पहिल्याच ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या...
किन्ही येथे धान पुंजणे जाळल्याने आठ...भंडारा ः साकोली तालुक्‍यातील किन्ही येथे १९...
पालघरचा मंजूर विकासनिधी सातव्यांदा...पालघरः मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्याच्या...