मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, केंद्र सरकारचे तीन नव्या कृषी कायद्यांना विरो
ताज्या घडामोडी
भातपिकासह ट्रॅक्टर जळून खाक
इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथे भाताची भवर आणि टॅँक्टर जळून खाक झाल्याची घटना घडली. ही घटना रात्री घडल्याने घटनेमागील कारण समजू शकले नाही.
अस्वली स्टेशन, जि. नाशिक : इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथे भाताची भवर आणि टॅँक्टर जळून खाक झाल्याची घटना घडली. ही घटना रात्री घडल्याने घटनेमागील कारण समजू शकले नाही.
विलास गेणू पागेरे यांचे भात सोंगणी काम अंतिम टप्प्यात आहे. सोंगलेला भात गुरुवारी (ता. २६) दिवसभर ट्रॅक्टरने वाहतूक करून घरी खळ्यावर आणला होता. सायंकाळी त्या ठिकाणी भाताच्या पेंढ्यांची भवर रचून ठेवली. रात्री दहापर्यंत भात सडकण्याचे कामदेखील सुरू होते. त्यानंतर जेवण करून सर्व जण घरात झोपायला गेले. मध्यरात्री शेतात रचलेली भवर पेटली. त्या सोबत ट्रॅक्टरदेखील जळून खाक झाला. दिवसभर शेतातील कामाने थकलेले पागेरे कुटुंबीय गाढ झोपेत असतानाच मध्यरात्री लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त होत आहे.
तलाठी मोरे यांचेसह सरपंच देविदास मोरे, ग्रामसेवक आदींसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत दुपारी घटनेचा पंचनामा करण्यात आला.
- 1 of 1029
- ››