Agriculture news in marathi Burn tur sudI at Wagi Khurd | Agrowon

वाघी खुर्द येथे तुरीची सुडी जळून खाक

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

शिरपूरजैन  ः येथून जवळच असलेल्या वाघी खुर्द येथील शिवाजी आरू यांच्या 
दोन एकर शेतातील तुरीच्या गंजीला अज्ञात इसमाने आग लावल्याची घटना मंगळवारी (ता. ११) रात्री घडली. यामध्ये शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असल्याची तक्रार त्यांनी पोलिसात दिली आहे. 

शिरपूरजैन  ः येथून जवळच असलेल्या वाघी खुर्द येथील शिवाजी आरू यांच्या 
दोन एकर शेतातील तुरीच्या गंजीला अज्ञात इसमाने आग लावल्याची घटना मंगळवारी (ता. ११) रात्री घडली. यामध्ये शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असल्याची तक्रार त्यांनी पोलिसात दिली आहे. 

या वर्षी तुरीच्या काढणीच्या काळामध्ये ढगाळ हवामान असल्यामुळे चिंता वाढली होती. शेतकऱ्यांना तुरीची काढणी करणे कठीण झाले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी तुरीची सोंगणी करीत शेतातच सुडी लावली होती. मात्र, अज्ञात व्यक्तींकडून शेतमाल पेटवून दिल्याच्या घटना वाढल्या आहेत. वाघी खुर्द येथील शिवाजी भागवत आरू यांनी दोन एकरात तुरीची लागवड केली होती. 

तुरीची सोंगणी करून एका ठिकाणी सुडी लावून ठेवली. ते बाहेरगावी गेल्याचे पाहून मंगळवारी रात्री उशिरा किंवा बुधवारी (ता. १२) पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने या सुडीला आग लावली. हा प्रकार बुधवारी सकाळी दिसून आला. आगीत संपूर्ण तूर जळून खाक झाली. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे.


इतर ताज्या घडामोडी
राज्यात कोरोनामुळे आणखी दोन मृत्यू;...पुणे: राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या...
वऱ्हाडात पूर्वमोसमी पावसाचा पुन्हा तडाखाअकोला  ः  वऱ्हाडातील काही भागांत...
‘कोरोना’ मुकाबल्यासाठी अकोल्यात टास्क...अकोला ः कोरोना विषाणूमुळे लागू असलेल्या...
‘कोरोना’विरुद्धचा लढा मानवजातीच्या...मुंबई: ‘कोरोना’विरुद्धचा लढा राज्य, देशांच्या...
फुलंब्री, भोकरदन तालुक्यात गारपीट;...औरंगाबाद/जालना : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील...
बुलडाण्यात ‘कोरोना’बाधिताचा मृत्यू;...बुलडाणा : जिल्ह्यात ‘कोरोना’ बाधिताचा मृत्यू...
नाशिकमध्ये आढळला कोरोनाबाधित रुग्ण नाशिक : जिल्ह्यात ‘कोरोना’चा रुग्ण आढळून...
नाशिक : ‘सह्याद्री’ उपलब्ध करुन देणार...नाशिक : शेतकऱ्यांनी एकत्र येत सुरू केलेली...
सातारा जिल्ह्यात सात लाख मेट्रीक टन ऊस...सातारा ः जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम...
खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा...
कोरोनाच्या माहिती संकलनासाठी ऑनलाईन...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
सोलापुरात वैद्यकीय सामग्री खरेदीसाठी...सोलापूर  : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
पुणे जिल्हा बॅंकेकडून पीक कर्ज...पुणे ः शेतकऱ्यांना पीक कर्जाची परतफेड करण्यासाठी...
जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी विरोधात...नाशिक : जीवनावश्यक वस्तूंची विक्री करतांना...
अकोला जिल्ह्यात फूलशेतीचे झाले मातेरेअकोला ः जिल्ह्यात फूलशेतीचे माहेरघर म्हणून...
मोर्शीत हमीभावाने तूर खरेदी रखडलीअमरावती ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव...
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेतील आर्थिक...नांदेड  : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणीत घरपोच भाजीपाला विक्री ठरतेय...परभणी ः मिरखेल आणि देशमुख पिंपरी येथील...
विदर्भात फुलांची उलाढाल ठप्पनागपूर  ः बंद काळात फळे, भाजीपाला...
तिडे येथे १४५ एकरांवरील कलिंगडे...चिपळूण, जि. रत्नागिरी  ः मंडणगड तालुक्यातील...