Agriculture news in Marathi Burning of Kangana Ranawat statue by farmer widows | Agrowon

शेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या पुतळ्याचे दहन

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या विधेयकाला विरोध करणाऱ्या शेतकरी व नेत्यांना अभिनेत्री कंगना राणावत हिने दहशतवादी संबोधले होते. तिच्या या वक्तव्याचा शेतकरी विधवांनी निषेध करीत कंगनाच्या पुतळ्याचे दहन केले.

यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या विधेयकाला विरोध करणाऱ्या शेतकरी व नेत्यांना अभिनेत्री कंगना राणावत हिने दहशतवादी संबोधले होते. तिच्या या वक्तव्याचा शेतकरी विधवांनी निषेध करीत कंगनाच्या पुतळ्याचे दहन केले.

शेतकरी, शेतकरी नेते, शेतकरी संघटना यांना विश्वासात न घेता व विधेयकामधील तरतुदीबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा न करता केंद्र सरकारने शेती संबंधित तीन विधेयकांना मंजुरी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारप्रती अविश्वासाचे वातावरण आहे. केंद्र सरकारकडून हे विधेयक शेतकरी हिताचे असल्याचे दावा केला जात असला तरी या विधेयकांना मंजूर करण्याची कार्यपद्धती मात्र अविश्वासाची नाही. याचा देशातील काही शेतकरी संघटना, शेतकऱ्यांनी निषेध केला.

लोकशाहीत शासन निर्णयाला पाठिंबा किंवा विरोध होत असतो. याची माहिती असताना देखील कंगना राणावत हिने शेतकऱ्यांचा आत्मसन्मान दुखावेल असे अपमानास्पद वक्तव्य केले. यावेळी अपर्णा मालोकर, भारती पवार, सुनिता पेंदोर, रेखा गुरनुले, सरस्वती अंबरवार यांची उपस्थिती होती.


इतर ताज्या घडामोडी
किसान रेल्वेने सांगलीतून हळद जाणार इतर...सांगली ः किसान रेल्वेतून शेतकऱ्यांसह, उद्योग आणि...
वऱ्हाडात पीएम किसानचे साडे तेरा कोटी...अकोला ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या मदतीस...
चिपळूणात साडेसात हजार शेतकऱ्यांना...रत्नागिरी ः परतीच्या पावसाने चिपळूण तालुक्यातील...
रिसोड बाजारात सोयाबीनची विक्रमी आवकवाशीम ः रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापूर जिल्ह्यात मदतीसाठी ३३५ कोटींची...सोलापूर : अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील...
अकोल्यात शेतकरी करणार दोन लाख क्विंटल...अकोला ः गेल्या काही हंगामापासून सोयाबीन...
संत गाडगेबाबा सूतगिरणी सुरू करावी ः...अमरावती : कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...
पुणे जिल्ह्यातील सगळी धरणे तुडूंबपुणे ः चालू वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये...
भंडाऱ्यात ७९ धान खरेदी केंद्रांना मंजुरीभंडारा ः केंद्र सरकारच्या किमान आधारभूत खरेदी...
सोलापूर जिल्ह्यात रास्त भाव दुकानांना...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
खानदेशात ३१ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी...जळगाव ः खानदेशात यंदा गव्हाची पेरणी सुमारे दोन...
परभणी जिल्ह्यात सतरा हजार क्विंटल...परभणी : ‘‘यंदाच्या रब्बी हंगामातील पेरणीसाठी...
शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची प्रतीक्षातऱ्हाडी, जि. धुळे : वरुणराजाच्या लहरीपणामुळे पिके...
नाशिक जिल्ह्यात लिलाव बंदमुळे शेतकरी...नाशिक : मागील वर्षी हवामान बदल, अवकाळी पाऊस व...
‘कृषी स्वावलंबन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज...परभणी : ‘‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ....
सोयाबीन बियाणे विक्रेत्यांविरुध्द ...अकोला ः यंदाच्या खरिपात सोयाबीन बियाणे उगवले...
शोषणाविरोधात एकवटले संत्रा उत्पादक अमरावती : व्यापाऱ्यांचा शोषणाविरोधात एल्गार...
कांदा साठा मर्यादा वाढविण्याची मागणी नाशिक: कांदा साठा मर्यादा घालून दिल्याने...
दुधाळ जनावरांच्या व्यवस्थापनाची सूत्रेगोठ्याच्या भोवतालच्या परिसरात दलदल आणि जास्त गवत...
पौष्टिक चाऱ्यासाठी बरसीम लागवड ठरते...द्विदल हिरव्या चाऱ्याची उपलब्धता हा...