Agriculture news in marathi business opportunity in beekeeping | Agrowon

मधमाशी पालनामध्ये मोठी व्यावसायिक संधी

डॉ. भास्कर गायकवाड
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

मधमाशी पालनामध्ये मधाच्या बरोबरीने सात विविध पदार्थ मिळतात. अनेक देशांमध्ये मधापासून विविध पदार्थ तयार केले जातात.

मधमाशी पालनामध्ये मधाच्या बरोबरीने सात विविध पदार्थ मिळतात. अनेक देशांमध्ये मधापासून विविध पदार्थ तयार केले जातात. त्याचा मानवी आरोग्याला कसा फायदा आहे, याचा विचार करून त्याचे उत्पादन वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. आपल्यालाही यामध्ये चांगली संधी आहे.

मधमाश्यांनी झाडांच्या फुलांपासून मिळविलेला मकरंदाचे मधामध्ये रूपांतर करून तो पोळ्यांमध्ये पुढील पिढीला खाद्य म्हणून साठविला जातो. पूर्वीच्या काळी मधाचा फक्त गोड पदार्थ म्हणून वापर केला जात होता. मधामध्ये मोठ्या प्रमाणात उपयुक्त अन्नघटक त्याचबरोबर अ‍ॅन्टिऑक्सिडंट आणि जैवरोधक गुणधर्म असल्यामुळे आज मधाचा वापर गोड पदार्थाबरोबरच आयुर्वेदिक औषधी घटक म्हणून होतो. मधमाश्यांनी तयार केलेल्या मधाला कोणतीही प्रक्रिया करावी लागत नाही. त्याची साठवण क्षमता वाढविण्यासाठी त्यामध्ये कोणतेही रसायन वापरावे लागत नाही. मध अनेक दिवस चांगल्या प्रकारे टिकतो. तापमान कमी झाले तर मधामध्ये साखरेसारखे स्फटिक तयार होतात. हा मधाचा नैसर्गिक गुणधर्म आहे. तापमान ४० अंश सेल्सिअस झाले तर स्फटिकांचे रूपांतर मधात होते. मधाचे सेवन वेगवेगळ्या पद्धतीने करता येते.

मेण 

  • तरुण कामकरी माश्या त्यांच्या शरीरातील ग्रंथींमधून चिकट पदार्थ स्रवतात. त्यास मेण म्हणतात. या मेणाचा वापर कामकरी माश्या त्यांचे घर तयार करण्यासाठी तसेच घराची दुरुस्ती करणे, तयार झालेल्या मधाचा कप्पा बंद करण्यासाठी करतात.
  • मेणाचा वापर कॉस्मेटिक तसेच कॅण्डल, फर्निचरचे पॉलिश यासारख्या अनेक बाबींमध्ये केला जातो.

परागकण 

  • मध आणि परागकणांचा वापर करून मधमाश्यांच्या पिल्लांची वाढ केली जाते. विशेषतः: मधमाश्यांची संख्या वाढविण्यासाठी परागकणांची जास्त गरज असते.
  • कामकरी माश्यांना परागकण गोळा करण्यासाठी विशेष अशा पिशवीची सोय असते. मधमाश्या मकरंद घेत असताना परागीभवनाची क्रिया करते. यादरम्यान त्या फुलांमधून परागकण गोळा करतात. गोळा केलेले मकरंद आणि परागकण मधमाश्या आपल्या पोळ्यामध्ये साठवितात.
  • शेतामध्ये परागकणांचे जास्त प्रमाण असेल तर जास्तीत जास्त परागकण गोळा करता येतात. यासाठी मधपेटीच्या प्रवेशद्वाराजवळ परागकण गोळा करण्यासाठी सापळा असतो, जेणेकरून मधमाशी आत जात असताना त्या सापळ्यामध्ये परागकण पडतात. पडलेले परागकण गोळा करून त्याचा वापर मानवी आरोग्यासाठी करता येतो.
  • परागकणांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने, जीवनसत्त्व बी, सी, डी, ई आणि के तसेच प्रो-व्हिटॅमिन ए असते. तसेच उपयुक्त अ‍ॅमिनो अ‍ॅसिडचे मुबलक प्रमाण असते.
  • परागकणांमुळे प्रतिकार क्षमता वाढते. रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता वाढते.
  • परागकणांचे सेवन केल्यामुळे शारीरिक ऊर्जा वाढून कार्यक्षमता वाढते. त्याचमुळे परागकणांचे दर मधापेक्षा तीन ते चारपट जास्त आहेत.

बी ब्रेड 

  • परागकण आणि मधापासून बनविलेल्या पदार्थाला बी ब्रेड म्हणतात. मधमाशी परागकण घेऊन आपल्या घरामध्ये साठविते. मधाचे आवरण देऊन परागकण साठविला जातो. नवीन पिल्लांना खाऊ घालण्यासाठी परागकण आणि मधाचे मिश्रण दिले जाते. यालाच बी ब्रेड म्हणतात.
  • मधमाश्यांची पिल्ले पराग कण तसेच मध खाऊ शकत नाही. म्हणून या दोघांचे मिश्रण गरजेनुसार वापरले जाते. काही देशांमध्ये बी ब्रेड या पदार्थाचे उत्पादन घेऊन ते मानवी आहारामध्ये वापरले जाते.

संपर्क- डॉ. भास्कर गायकवाड, ९८२२५१९२६०
( लेखक शेतीतज्ज्ञ आहेत)


इतर कृषिपूरक
कोंबड्यांना वेळेवर लसीकरण महत्त्वाचे...कोंबड्यांना आजार होऊ नये म्हणून लसीकरण करावे....
पशुपालन सल्लापावसाळ्यामध्ये हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे...
पशूपालनामध्ये ‘आरएफआयडी’ तंत्रज्ञान...जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा...
जंतनाशकाप्रती प्रतिकार तयार होण्याची...जनावरांच्यामध्ये जंत प्रादुर्भाव झाल्याची तीव्रता...
सागरी शेवाळ उत्पादनात व्यावसायिक संधीसागरी शेवाळ उत्पादनामुळे व्यावसायिक संधी उपलब्ध...
ओळखा जनावरांतील जंताचा प्रादुर्भाव...जंताची प्रादुर्भाव झालेल्या जनावरांची...
गोचीडनाशकांबाबत प्रतिकारक्षमता...गोचिड नियंत्रणासाठी जनावरे आणि गोठ्याची स्वच्छता...
फायदेशीर गर्भप्रत्यारोपण तंत्रज्ञानगर्भप्रत्यारोपण तंत्रज्ञानामुळे अत्यंत कमी...
जनावरांमध्ये योग्य पद्धतीने जंतनिर्मूलनजंताची प्रतिकारशक्ती वाढल्याने औषधीवरील खर्च वाया...
वासरांच्या वाढीसाठी मिल्क रिप्लेसरमिल्क रिप्लेसरमध्ये प्रतिजैविकांचा समावेश...
गाई, म्हशींतील कासदाहवर उपाययोजनाकासदाहाची लक्षणीय कासदाह व सुप्त कासदाह असे दोन...
मत्स्य संवर्धनासाठी तळ्याचा आराखडामत्स्य संवर्धनासाठी लागणारे तळे हे शेततळ्यापेक्षा...
वराह फार्मचे व्यवस्थापन...वराहपालन सुरू करताना फार्मचा आकार आणि वराह...
उष्णतेच्या ताणापासून दुधाळ जनावरांची...वातावरणातील तापमान व हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे...
गाई, म्हशींमधील छातीचे आजारजनावरांमधील छातीच्या आजारामुळे दुग्धोत्पादनावर...
वराहपालन सुरू करताना...वराहपालनातून स्वयंपूर्ण होता येईल का, हे जाणून...
गीर संवर्धन करणारा भरवाड समुदायभरवाड समुदायासाठी गीर गोवंश संपत्ती आहे....
बहुगुणी मधाची शुद्धता अन् उपयोग मधमाश्यांपासून मधासोबतच अन्य मौल्यवान...
कृषी उत्पादन वाढीसाठी मधमाश्या...जागतिक मधमाशी दिवस विशेष वाढते शेतीक्षेत्र,...
आहारात असावा आरोग्यदायी क्विनोआआंध्र प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात क्विनोआची...