नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२ लाख क्विंटल कापूस खरेदी

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२ लाख क्विंटल कापूस खरेदी
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२ लाख क्विंटल कापूस खरेदी

नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांमध्ये भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि खासगी व्यापारी यांची मिळून एकूण ११ लाख ९८ हजार ३२३ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. 

खुल्या बाजारातील दर हमीदरापेक्षा जास्त असल्यामुळे राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या केंद्रांवर खरेदी होऊ शकली नाही. परंतु पणन महासंघाची सीसीआयचे सब एजंट म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, या तीन जिल्ह्यांत चार ठिकाणी हमीभावाने कापूस खरेदीसाठी केंद्र सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, फरदड कपाशीची आवक सुरू असल्यामुळे कापसाचे पाच हजार रुपयांपेक्षा कमी झाले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील नांदेड, धर्माबाद, कुंटूर या ठिकाणी मंगळवार (ता. १९) पर्यंत भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय)ची एकूण १० हजार ३५५ क्विंटल कापूस खरेदी झाली. खासगी व्यापाऱ्यांतर्फे एकूण १४ जिनिंगमध्ये कापूस खरेदी करण्यात आली. यामध्ये नांदेड येथे ८ हजार १४३ क्विंटल, कुंटूर येथे ८ हजार ५७५ क्विंटल, धर्माबाद येथे १ लाख ४१ हजार ३५४ क्विंटल, भोकर येथे १ लाख ८१ हजार ९२८ क्विंटल, हदगाव येथे ११ हजार ३५५ क्विंटल, किनवट येथे २५ हजार ३०९ क्विंटल खरेदी झाली आहे. 

नांदेड जिल्ह्यात खासगी व्यापाऱ्यांकडून एकूण ३ लाख ७६ हजार ६६४ क्विंटल कापूस खरेदी झाली. सीसीआय आणि खासगी व्यापाऱ्यांची मिळून एकूण ३ लाख ८७ हजार १९ क्विंटल कापूस खरेदी झाली.

परभणी जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोमवार (ता. १८) पर्यंत एकूण ७ लाख ४७ हजार ८८  क्विंटल कापूस खरेदी झाली. यामध्ये भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआय) २० हजार २५३ क्विंटल आणि खासगी व्यापाऱ्यांकडून ७ लाख २६ हजार ८३५ क्विंटल कापूस खरेदी झाली. हिंगोली जिल्ह्यातील ७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये एकूण ६४ हजार २१६ क्विंटल कापूस खरेदी झाली. यामध्ये भारतीय कापूस महामंडळातर्फे (सीसीआय) ३७ हजार ६० क्विंटल कापूस खरेदी झाली. तीन ही जिल्ह्यांत सरासरी ५ हजार २५० ते ५ हजार ४७० रुपये पर्यंत दर मिळाले. सध्या फरदड कपाशीची आवक सुरू झाली असून, कापसाचे प्रतिक्विंटलचे दर ४ हजार ८०० रुपये पर्यंत कमी झाले आहेत.

जिल्हानिहाय कापूस खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)
जिल्हा कापूस खरेदी
नांदेड ३,८७,०१९
परभणी ७,४७,०८८
हिंगोली ६४,२१६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com