agriculture news in marathi, Buy 1250 quintals of urad in Solapur | Agrowon

सोलापुरात बाराशे क्विंटल उडदाची खरेदी

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पाच ठिकाणी हमीभाव केंद्रे सुरू होणार आहेत. तरी प्रत्यक्षात कुर्डूवाडीचेच केंद्र सुरू झाले असून, या केंद्रावर १८५ शेतकऱ्यांच्या १२४१ क्विंटल उडदाची खरेदी झाली आहे. पाच केंद्रांवर ३५७१ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली असल्याचे सांगण्यात आले.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पाच ठिकाणी हमीभाव केंद्रे सुरू होणार आहेत. तरी प्रत्यक्षात कुर्डूवाडीचेच केंद्र सुरू झाले असून, या केंद्रावर १८५ शेतकऱ्यांच्या १२४१ क्विंटल उडदाची खरेदी झाली आहे. पाच केंद्रांवर ३५७१ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली असल्याचे सांगण्यात आले.

यावर्षी खरिपातील सोयाबीन, मूग, उडिदाची हमीभाव केंद्रांवर खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना आॅनलाइन नोंदणी करण्याचे बंधनकारक केले आहे़. सोलापूर जिल्ह्यात कुर्डूवाडी, बार्शी, सोलापूर, दुधनी व अक्कलकोट येथे हमीभाव केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. या केंद्रावर उडीद, सोयाबीन व मुगाची आॅनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन केल्यानंतर कुर्डूवाडी केंद्रावर सर्वाधिक दोन हजार १९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली.

सोलापूर केंद्रावर १४६, अक्कलकोट १२१, दुधनी ६१ तर बार्शी केंद्रावर १२२४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. बार्शी केंद्रावर नोंदणी केलेल्यांमध्ये १५० शेतकऱ्यांनी सोयाबीनची नोंद केली आहे. नोंदणी केलेल्या पैकी केवळ कुर्डूवाडी केंद्रावर १८५ शेतकऱ्यांच्या १२४१ क्विंटलची विक्री झाली आहे. अन्य हमीभाव केंद्रांपैकी बार्शी व दुधनी केंद्र सुरू करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात धान्याची खरेदी झालेली नाही. दुधनी केंद्रावर धान्य आणण्यासाठी शेतकऱ्यांच्या मोबाईलवर एसएमएस पाठविला असला तरी शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...