Agriculture news in marathi Buy bananas on credit in Khandesh | Agrowon

खानदेशात केळीची उधारीने खरेदी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

जळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात खरेदी सुरू झाली आहे. कमी दर त्यातच उधारीने खरेदी केली जात आहे.

जळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात खरेदी सुरू झाली आहे. कमी दर त्यातच उधारीने खरेदी केली जात आहे. विशेष म्हणजे कोणत्याही बाजार समितीचे या समस्येकडे लक्ष नसल्याची स्थिती आहे. 

कांदेबाग केळीसाठी जळगाव जिल्ह्यात चोपडा, जळगाव, जामनेर परिसर कांदेबाग केळीसाठी प्रसिद्ध आहे. धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील तापी, अनेर काठच्या भागातही कांदेबाग केळी आहे. खानदेशात सुमारे सात हजार हेक्टरवर कांदेबाग केळी असते. या केळीची काढणी सप्टेंबरमध्ये सुरू होते. आगाप बागांमधून ऑगस्टच्या अखेरिस किंवा मध्यात काढणी सुरू होते. यंदा काढणी वेळेस सुरू झाली. बागाही जोमात आहेत.

सुरवातीला कांदेबाग केळीला १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. यंदा एप्रिल ते ऑगस्टपर्यंत केळीचे दर ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल एवढे होते. 

ऑगस्टच्या मध्यानंतर मुक्ताईनगर, रावेर, यावल भागातील केळीची काढणी संपली. केळीची आवक खानदेशात घटली. यामुळे आगाप कांदेबाग केळीला बऱ्यापैकी दर मिळत होते. ऑगस्टच्या अखेरिस चोपडा, शिरपूर भागात रोज ३० ते ३५ ट्रक (एक ट्रक १४ टन क्षमता) कांदेबाग केळीची आवक सुरू होती. पण, ही आवक सप्टेंबरच्या मध्यानंतर वाढली. 

सध्या खानदेशात रोज १०० ते ११० ट्रक कांदेबाग केळीची आवक सुरू आहे. जेथे अधिक किंवा ट्रकभर (एकाच शेतात १५ टन केळी) केळी उपलब्ध होते. शिवाय या केळीची दर्जा चांगला असला, तर खरेदीदार ९०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर देत आहेत. परंतु, ज्या बागेत कमी रासची (कमी दर्जा) केळी आहे व एकाच शेतात २५ ते ३० क्विंटल केळी उपलब्ध होत असेल तर, अशा खरेदीच्या व्यवहारात खरेदीदार ५०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर देत आहेत. 

शेतकऱ्यांच्या फसवणूकीची शक्यता

उधारीचे व्यवहाराचे प्रकार चोपडामधील अडावद, धानोरा, शिरपूर भागात सुरू आहेत. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. या खरेदीवर चोपडा, यावल, शिरपूर, जळगाव किंवा इतर बाजार समित्यांचे लक्ष नाही. खरेदीदारांकडे खरेदीचे परवाने, बाजार समित्यंकडे अनामत रक्कम भरणा अशी नियमावलीदेखील पाळलेली नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.


इतर ताज्या घडामोडी
किसान रेल्वेने सांगलीतून हळद जाणार इतर...सांगली ः किसान रेल्वेतून शेतकऱ्यांसह, उद्योग आणि...
वऱ्हाडात पीएम किसानचे साडे तेरा कोटी...अकोला ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या मदतीस...
चिपळूणात साडेसात हजार शेतकऱ्यांना...रत्नागिरी ः परतीच्या पावसाने चिपळूण तालुक्यातील...
रिसोड बाजारात सोयाबीनची विक्रमी आवकवाशीम ः रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापूर जिल्ह्यात मदतीसाठी ३३५ कोटींची...सोलापूर : अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील...
अकोल्यात शेतकरी करणार दोन लाख क्विंटल...अकोला ः गेल्या काही हंगामापासून सोयाबीन...
संत गाडगेबाबा सूतगिरणी सुरू करावी ः...अमरावती : कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...
पुणे जिल्ह्यातील सगळी धरणे तुडूंबपुणे ः चालू वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये...
भंडाऱ्यात ७९ धान खरेदी केंद्रांना मंजुरीभंडारा ः केंद्र सरकारच्या किमान आधारभूत खरेदी...
सोलापूर जिल्ह्यात रास्त भाव दुकानांना...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
खानदेशात ३१ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी...जळगाव ः खानदेशात यंदा गव्हाची पेरणी सुमारे दोन...
परभणी जिल्ह्यात सतरा हजार क्विंटल...परभणी : ‘‘यंदाच्या रब्बी हंगामातील पेरणीसाठी...
शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची प्रतीक्षातऱ्हाडी, जि. धुळे : वरुणराजाच्या लहरीपणामुळे पिके...
नाशिक जिल्ह्यात लिलाव बंदमुळे शेतकरी...नाशिक : मागील वर्षी हवामान बदल, अवकाळी पाऊस व...
‘कृषी स्वावलंबन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज...परभणी : ‘‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ....
सोयाबीन बियाणे विक्रेत्यांविरुध्द ...अकोला ः यंदाच्या खरिपात सोयाबीन बियाणे उगवले...
शोषणाविरोधात एकवटले संत्रा उत्पादक अमरावती : व्यापाऱ्यांचा शोषणाविरोधात एल्गार...
कांदा साठा मर्यादा वाढविण्याची मागणी नाशिक: कांदा साठा मर्यादा घालून दिल्याने...
दुधाळ जनावरांच्या व्यवस्थापनाची सूत्रेगोठ्याच्या भोवतालच्या परिसरात दलदल आणि जास्त गवत...
पौष्टिक चाऱ्यासाठी बरसीम लागवड ठरते...द्विदल हिरव्या चाऱ्याची उपलब्धता हा...