Agriculture news in Marathi Buy cashew nuts at the rate of Rs 120 in Sindhudurg | Agrowon

सिंधुदुर्गात काजू बी प्रतिकिलो १२० रुपये दराने खरेदी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 एप्रिल 2020

सिंधुदुर्ग ः काजू बागायतदारांकडून काही दलाल ८० ते ८५ रुपये दराने काजू बी खरेदी करून बागायतदारांची फसवणूक करीत आहेत. ही फसवणूक टाळण्यासाठी काजू बी प्रतिकिलो १२० रुपये दर निश्‍चित करून दोडामार्ग शेतकरी संघटनेने काजू बी खरेदीला उसप (ता. दोडामार्ग) मधून खरेदीला प्रारंभ केला आहे. पहिल्याच दिवशी तब्बल १ हजार किलो काजू खरेदी करण्यात आल्या. शेतकरी संघटनेने पुढाकार घेतल्यामुळे काजू बागायतदारांना दिलासा मिळाला आहे.

सिंधुदुर्ग ः काजू बागायतदारांकडून काही दलाल ८० ते ८५ रुपये दराने काजू बी खरेदी करून बागायतदारांची फसवणूक करीत आहेत. ही फसवणूक टाळण्यासाठी काजू बी प्रतिकिलो १२० रुपये दर निश्‍चित करून दोडामार्ग शेतकरी संघटनेने काजू बी खरेदीला उसप (ता. दोडामार्ग) मधून खरेदीला प्रारंभ केला आहे. पहिल्याच दिवशी तब्बल १ हजार किलो काजू खरेदी करण्यात आल्या. शेतकरी संघटनेने पुढाकार घेतल्यामुळे काजू बागायतदारांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात काजू हंगामातच देशभरात ‘कोरोना’ संसर्ग सुरू झाला. त्यामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले. याचाच फायदा काही काजू खरेदी करणाऱ्या दलालांनी घेण्यास सुरुवात केली. काजू बीचा प्रतिकिलो १४० रुपये दर ‘कोरोना’चे कारण पुढे करीत प्रतिकिलो ८० ते ८५ रुपयांवर आणला.अजूनही दर कमी होणार अशी भीती पसरवून खरेदी करण्याचे काम जिल्ह्यात सुरू होते. त्यामुळे प्रतिकिलो ६० ते ७० रूपये दर कमी झाल्यामुळे बागायतदारांची झोपच उडाली.

दरम्यान या संदर्भात पालकमंत्री उदय सांमत यांनी आंबा, काजूच्या दराबाबत वेंगुर्ला फळ संशोधन केंद्र येथे बैठक घ्यावी, अशी सूचना केली होती. त्यानुसार तहसीलदार प्रवीण लोकरे याच्या प्रमुख उपस्थितीत काजू कारखानदार, व्यापारी, बागायतदार यांची संयुक्त बैठक झाली. बैठकीत महाराष्ट्र कॅश्‍यू मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनतर्फे दोडामार्ग, बांदा भागातील काजू बी करिता १०० रूपये, कणकवली -९० रूपये, तर वेंगुर्ला व इतर भागातील काजू करिता प्रतिकिलो ८५ रूपये दर निश्‍चित करण्यात आला असल्याचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांनी सभेत स्पष्ट केले. यावेळी काजू बागायतदार नितीन कुबल आणि जयप्रकाश चमणकर यांनी प्रतिकिलो १२० रूपये दर मिळावा, अशी मागणी केली.

संयम बाळगा चांगला दर मिळेल
दरम्यान शेतकऱ्यांची काजू बी खरेदीत होणारी फसवूणक टाळावी आणि शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा या हेतूने दोडामार्ग शेतकरी संघटनेने पुढाकार घेतला आहे. काजू बागायतदारांनी डगमगू नये. थोडा संयम बाळगल्यास आणखी चांगला दर काजूला मिळेल. गेल्यावर्षी काजूला १८० रुपये दर होता. यावर्षी सुरुवातीला १४० रुपये दर होता. परंतु ‘कोरोना’चे कारण पुढे करीत काही लोक फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे थांबविण्यासाठीच शेतकरी संघटनेने हे पाऊल उचलले असल्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर सावंत आणि सदस्य चंद्रशेखर देसाई यांनी स्पष्ट केले.


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...
सुपारी फळगळीचे संकटसिंधुदुर्ग: मुसळधार झालेला पाऊस आणि सतत ढगाळ...
कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यतापुणे ः गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही...
कांदा निर्यातबंदीविरोधात मराठवाड्यातही...औरंगाबाद/परभणी: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी...
निर्यातबंदीमुळे कांदा दरात मोठी घसरणनाशिक: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याचा...
कांदा निर्यातबंदी विरोधात नाशिक...नाशिक: प्रतिकूल हवामान, वाढलेला उत्पादन खर्च व...
‘स्मार्ट’च्या २८ पथदर्शक प्रकल्पांना...पुणे: कृषी खात्याच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पातून...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष फळ छाटणी...सांगली ः जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
राज्यात तीन वर्षांत ‘ई-नाम’द्वारे ...पुणे: केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...