`किमतीची शहानिशा करूनच रासायनिक खते खरेदी करा`

औरंगाबाद : ‘‘शेतकऱ्यांनी बॅगवरील किमतीची शहानिशा करूनच रासायनिक खतांची खरेदी करावी. तक्रार असल्यास तत्काळ करावी. तालुका व जिल्हा स्तरावरून तक्रारीची तत्काळ दक्षता घेऊन संबंधित विक्रेत्यावर कारवाई करण्यात येईल,’’ अशी माहिती कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी दिली.
Buy chemical fertilizers only after checking the price
Buy chemical fertilizers only after checking the price

औरंगाबाद : ‘‘शेतकऱ्यांनी बॅगवरील किमतीची शहानिशा करूनच रासायनिक खतांची खरेदी करावी. तक्रार असल्यास तत्काळ करावी. तालुका व जिल्हा स्तरावरून तक्रारीची  तत्काळ दक्षता घेऊन संबंधित विक्रेत्यावर कारवाई करण्यात येईल,’’ अशी माहिती कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी दिली.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, तसेच उपाध्यक्ष तथा कृषी सभापती एल. जी. गायकवाड यांनी संयुक्तपणे ही माहिती स्पष्ट केली. केंद्र शासनाच्या एनबीएस ( न्युट्रीयंट बेसड पॉलिसी ) पॉलिसीनुसार युरिया वगळता इतर रासायनिक खतांचे दर ठरविण्याचे अधिकार त्या त्या रासायनिक खत उत्पादक कंपनीस आहेत. कच्च्या मालाच्या किमतीचा दाखला देत एप्रिल नंतर कांही रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी संयुक्त खते, डीएपी, एसएसपी, एमओपी  या खतांच्या किमतीत वाढ केली आहे.

सद्यःस्थितीत बाजारात जुन्या दराची खते सुद्धा आहेत. रासायनिक खतांच्या बॅगवर छापलेल्या किमती तपासूनच शेतकऱ्यांनी खरेदी करावी. छपाई किंमतीपेक्षा जादा किंमत अदा करू नये. रासायनिक खतांचा कांही ग्रेडच्या किमती वाढल्या असल्या तरी जुन्या दरांची खते ( जुने दर छपाई केलेल्या बॅगा ) त्याच दरात शेतकऱ्यांना विकणे कृषी विक्रेत्यांना बंधनकारक आहे. तसे निर्देश सर्व कृषी विक्रेत्यांना देण्यात आले आहेत. 

कुठलाही विक्रेता जुन्या दरातील खत वाढीव किंमत आकारून विकत असल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ संबंधित तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी पंचायत समिती यांना रीतसर तक्रार करावी. संबंधित तालुक्याचा नियंञण कक्ष, भरारी पथकास रीतसर तक्रार करावी. तालुका, जिल्हा स्तरावरील सनियंञण कक्षास  ०२४०-२३२९७१७ या दूरध्वनी क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com