नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत साडेपाच लाख क्विंटलवर कापूस खरेदी

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत साडेपाच लाख क्विंटलवर कापूस खरेदी
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत साडेपाच लाख क्विंटलवर कापूस खरेदी

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या खरेदी हंगामामध्ये सोमवार (ता. ३१) पर्यंत भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि खासगी व्यापारी यांची मिळून एकूण ५ लाख ९१ हजार ५७९ क्विंटल कापूस खरेदी झाली. 

दुष्काळी स्थितीमुळे कोरडवाहू क्षेत्रातील कापूस वेचणी हंगाम लवकरच आटोपला आहे. ओलित क्षेत्रातील फरदड कपाशीची आवक सुरू झाली आहे. सद्यःस्थितीत बाजार समित्यांतील कापसाची आवक कमी आहे. खुल्या बाजारातील दर आधारभूत किमतीपेक्षा जास्त असल्यामुळे कापूस उत्पादक पणन महासंघाच्या केंद्रांवर कापूस खरेदी होऊ शकली नाही.

नांदेड जिल्ह्यांमध्ये सीसीआयची कुंटूर, नायगांव, धर्माबाद, कलटगांव या पाच ठिकाणी खरेदी केंद्रे आहेत. त्यापैकी फक्त कलटगाव केंद्रावर १७० क्विंटल कापूस खरेदी झाली. खासगी व्यापाऱ्यातर्फे नांदेड येथे ५ हजार २४३ क्विंटल, कुंटूर येथे ४ हजार ५८५ क्विंटल, धर्माबाद येथे ६० हजार ६५४ क्विंटल, भोकर येथे ७९ हजार २९६ क्विंटल, हदगाव येथे ३ हजार ५०५ क्विंटल, किनवट येथे ११ हजार ८८९ क्विंटल अशी एकूण १ लाख ६५ हजार १७२ क्विंटल कापूस खरेदी झाली. सीसीआय आणि खासगी मिळून एकूण १ लाख ६५ हजार ३४२ क्विंटल खरेदी झाली. त्याला प्रतिक्विंटल ५ हजार ४०० ते ५ हजार ५५० रुपये दर मिळाले.

परभणी जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ही खरेदी सुरू आहे. सोमवारपर्यंत सीसीआयची ३ हजार ५७३ क्विंटल कापूस खरेदी झाली. सीसीआयकडून प्रतिक्विंटल ५ हजार ३५० ते ५ हजार ४५० रुपये दर मिळाले. खासगी व्यापाऱ्यांकडून ३ लाख ९१ हजार ९२९ क्विंटलची खरेदी झाली, तर दर प्रतिक्विंटल ५ हजार ४५० ते ५ हजार ७०० रुपये मिळाला. दोघांची एकूण ३ लाख ९५ हजार ५०२ क्विंटल कापूस खरेदी झाली.

हिंगोली जिल्ह्यातील ७  कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कापूस खरेदी झाली. सीसीआयतर्फे ११ हजार २३८ क्विंटल कापूस खरेदी झाली. प्रतिक्विंटल ५ हजार ३५० ते ५ हजार ४५० रुपये दर मिळाला. खासगी व्यापाऱ्यांकडून १९  हजार ४३७ क्विंटल कापूस खरेदी झाली. त्याला ५ हजार ४५० ते ५ हजार ५५० रुपये दर मिळाले. दोघांची एकूण ३० हजार ७३५ क्विंटल कापूस खरेदी झाली, असे सूत्रांनी सांगितले.

जिल्हानिहाय कापूस खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)

जिल्हा कापूस खरेदी
नांदेड  १,६५,३४२
परभणी   ३,९५,५०२
हिंगोली ३०७३५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com