Agriculture news in marathi Buy cotton at home, demand for female farmer to CM | Agrowon

घरातील कापूस खरेदी करा, महिला शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 एप्रिल 2020

राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ आणि सीसीआयतर्फे तत्काळ कापूस खरेदी सुरु करावी, अशी मागणी मांडाखळी (ता.परभणी) येथील महिला शेतकरी सत्यभामा लोहट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ई मेलव्दारे केली आहे. 

परभणी : उन्हाळा सुरु झाला आहे. तापमानात वाढ होत आहे. या परिस्थितीत घरात कापूस साठवून ठेवणे जोखमीचे झाले आहे. त्यामुळे राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ आणि सीसीआयतर्फे तत्काळ कापूस खरेदी सुरु करावी, अशी मागणी मांडाखळी (ता.परभणी) येथील महिला शेतकरी सत्यभामा लोहट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ई मेलव्दारे केली आहे. 

सत्यभामा लोहट यांनी ई मेल मध्ये म्हटले आहे की, त्यांचा संपूर्ण कापूस अजून घरात आहे. ‘कोरोना’मुळे सध्याची परिस्थिती गंभीर आहे. मुख्यमंत्री उध्द्वव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून आमच्या आशा आहेत. या संकटसमयी आम्ही तुमच्या सोबत आहोत. परंतु, शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे. वर्षभर राबराब राबून खर्च करून घरात आलेला कापूस अजून तसाच घरी आहे. इतर कडधान्य साठवता येईल, परंतु कापूस घरी ठेवणे अत्यंत धोकादायक आहे. 

सध्या ऊन्ह खूप तापत आहे. एखादी ठिणगी पण कापसाची राख करू शकते. हा विचारच फार त्रासदायक आहे. त्यामुळे कापूस खरेदी व्हावा, हीच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची इच्छा आहे. कारण बऱ्याच दिवसांपासून कापूस खरेदी बंद आहे. माल घरी राहिला, तर नवीन वर्षात बी-बियाणे, खते कशी खरेदी करायची, हा सवाल आहे. 

आम्ही मावळे तुमच्यासोबत..

आम्हांला माहीत आहे की, तुम्ही खूप मेहनतीने ‘कोरोना’चा लढा लढत आहात. आम्ही मावळे पण तुमच्या सोबत आहोतच. परंतु, आमच्या कापसाच्या प्रश्नांवर देखील तुम्हीच आमची शेवटची आशा आहात. नक्कीच आपल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे, असे लोहट यांनी नमूद केले आहे. 


इतर ताज्या घडामोडी
अटींवरच शेतकऱ्यांना वर्ध्यात कापूस...वर्धा  ः वर्धा जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या...
चंद्रपूर जिल्ह्यात पंधरा हजारांवर ...चंद्रपूर ः शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची हमी राज्य...
शेतकऱ्यांना प्रतीक्षा फळपीक विमा...नगरः मृगबहारासाठी पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत...
पुणे जिल्ह्यातील गावांतील आठवडे बाजार...पुणे: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अडीच...
माती परीक्षणानुसार करा खतांचे नियोजनमाती परीक्षण हा पीक उत्पादनाचा आत्मा आहे. आगामी...
सुधारित तंत्राने करा शेवगा लागवडलागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील अंतर २.५ ते ३...
भात पुर्नलागवडीची चारसूत्री पद्धतीसूत्र १  भातपिकाच्या अवशेषांतील (तुसाचा व...
हिंगोलीत हळद ४८०० ते ५२०० रुपये...हिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
संतुलित खत व्यवस्थापनावर द्या भरमाती परीक्षणानुसार जमिनीमध्ये उपलब्ध...
सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी...
दापोली, मंडणगडमध्ये बागांना फटकारत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा...
नगर जिल्ह्यात ‘निसर्ग'चा शेतीपिकांना...नगर : कोकण आणि मुंबईला तडाखा देणारे निसर्ग...
पुणे जिल्ह्यात ‘निसर्ग’चे थैमान पुणे : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी (ता.३)...
नाशिक जिल्ह्यात चक्रीवादळामुळे...नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात दुपारनंतर...
सुधारित तंत्राने शेवगा लागवडशेवग्याची लागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील...
वेलीचा वाढता जोम नियंत्रणात ठेवण्याकडे...द्राक्षबागेत गेल्या दोन दिवसापासून वातावरण...
कोरडवाहू शेतीसाठी आंतरपीक पद्धती...महाराष्ट्र राज्यात कोरडवाहू शेतीचे जवळपास ८५...
फळबागांमध्ये घ्या फुलांचे आंतरपीकफळपिकांच्या लागवडीमध्ये आंतरपीक घेणे हा एक चांगला...
मांडा ग्रामपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रकआपल्या गावाचा ग्रामविकास आराखडा आपण सर्वांनी...
नाशिकमध्ये दोडका ३३३५ ते ४५८५ रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...