बुलडाणा जिल्ह्यात आजपासून दोन ठिकाणी कापूस खरेदी

Buy cotton in two placesFrom tomorrow in Buldana district
Buy cotton in two placesFrom tomorrow in Buldana district

बुलडाणा : जिल्ह्यात कापूस हंगाम सुरू झाला असून, खुल्या बाजारात दर कमी मिळत आहेत. तातडीने कापूस खरेदी सुरू करावी, अन्यथा पणन महामंडळाच्या कार्यालयात आंदोलन करू, असा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने इशारा दिला होता. याची दखल घेत जिल्ह्यात देऊळगावराजा आणि जळगाव जामोद येथे खरेदी केंद्र गुरुवार (ता. २८) पासून सुरू केले जात आहे. 

बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुका हा कापूस उत्पादनात आघाडीवर आहे. या ठिकाणी कापसाची मोठी बाजारपेठ असल्याने सिंदखेडराजा, जालना, जाफराबाद यांसह अन्य तालुक्यांतील शेतकरी या आपला कापूस विक्रीसाठी आणतात. खुल्या बाजामध्ये कापसाला कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हा अध्यक्ष सतीश विष्णू मोरे यांनी कापूस पणन महासंघाकडे देऊळगांवराजा येथे केंद्र उघडण्याची मागणी केली होती.

मागणी मान्य न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्या मागणीची दखल घेऊन कापूस पणन महासंघाच्या वतीने देऊळगावराजा तसेच जळगाव जामोद येथे गुरुवारी कापूस खरेदीचा शुभारंभ केला जात आहे, अशी माहिती श्री. मोरे यांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com