Agriculture news in marathi buy to Farhad cotton: Former Agriculture Minister Bonde | Agrowon

एफएक्‍यू. सोबतच फरदड कापूस खरेदी करावा ः माजी कृषिमंत्री डॉ. बोंडे 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 एप्रिल 2020

अमरावती ः कापूस खरेदीचा निर्णय शेतकऱ्यांऐवजी व्यापारी हिताचाच अधिक असल्याचा आरोप माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा द्यायचा असेल तर एफ.ए.क्‍यू. सोबतच फरदड ग्रेडचाही कापूस खरेदी करावा, अशी मागणीही त्यांनी या संदर्भाने केली आहे. 

अमरावती ः कापूस खरेदीचा निर्णय शेतकऱ्यांऐवजी व्यापारी हिताचाच अधिक असल्याचा आरोप माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा द्यायचा असेल तर एफ.ए.क्‍यू. सोबतच फरदड ग्रेडचाही कापूस खरेदी करावा, अशी मागणीही त्यांनी या संदर्भाने केली आहे. 

विदर्भात सुमारे १५० लाख क्‍विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. दरवाढीच्या अपेक्षेने ठेवलेला कापूस लॉकडाऊनमुळे विकल्याच गेला नाही. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. त्यासोबतच हा कापूस कावरलेला असल्याने त्यापासून अंगाला खाजही सुटते. तापमान वाढल्यास आग लागण्याचा धोकाही आहे. त्यामुळे राज्यात कापूस खरेदीची मागणी होती. त्याची दखल घेत राज्यात सोमवार (ता. २०) पासून कापूस खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतू एफ.ए.क्‍यू. दर्जाचाच कापूस खरेदी करण्याचे आदेश पणन सचिवांकडून देण्यात आले आहेत. केंद्रावर तासनतास घालविल्यानंतर शेतकऱ्याला त्याचा कापूस एफ.एफ.ए.क्‍यू नसल्याचे सांगत परत केला जाईल. हा कापूस नंतर शेतकऱ्याला व्यापाऱ्याला विकण्यासाठी फिरावे लागणार आहे. त्यामुळे कापूस खरेदीचा उद्देश काय? असा प्रश्‍न डॉ. बोंडेंनी उपस्थित केला आहे. 

कापूस खरेदीची तयारीच नाही 
कापूस खरेदी विषयक कोणतीच तयारी अद्याप झालेली नाही, असे उत्तर पणनकडून देण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. बोंडे यांनी दिली. त्यामुळे कापूस खरेदीबाबत अनिश्‍चितता वाटते, असेही ते म्हणाले. 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...