Agriculture news in Marathi Buy grain guaranteed, otherwise agitation | Agrowon

धानाची हमीभावाने खरेदी करा, अन्यथा आंदोलन

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 मे 2021

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून हमीभावाने धान खरेदी न करताच ३१ मार्च रोजी खरेदी बंद करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून, कमी दराने शिल्लक धानाची विक्री त्यांना करावी लागत आहे.

नागपूर : नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून हमीभावाने धान खरेदी न करताच ३१ मार्च रोजी खरेदी बंद करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून, कमी दराने शिल्लक धानाची विक्री त्यांना करावी लागत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या नोंदणीकृत शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल सातशे रुपये बोनस जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

रामटेक उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांना निवेदन देत ही समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली. याप्रश्‍नी गुरुवार (ता. ६) पर्यंत तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

रामटेक तालुक्यातील शेतकऱ्यांनी या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर प्रतीकात्मक आंदोलन केले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांना निवेदन सादर करण्यात आले. राज्य शासनाने आदिवासी विकास महामंडळाच्या मार्फत रामटेक तालुक्यातील भंडारबोडी  (महादुला), पवनी, हिवरा बाजार व बांद्रा या चार ठिकाणी तसेच महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून अन्य चार ठिकाणी धान्य खरेदी केंद्र सुरू केले होते. या केंद्रांवर शेतकऱ्यांना आधारभूत किमतीने विकत येणार होता.

या केंद्रावर धान विकल्यास हमीसोबतच शेतकऱ्यांना ५० क्विंटलच्या मर्यादेत सातशे रुपये बोनस मिळणार होता. त्याकरिता शेतकऱ्यांनी नियमानुसार नोंदणी केली. मात्र नोंदणीकृत शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी होण्यापूर्वीच हे आठही केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे धान विक्रीविना शिल्लक आहे. हमीभाव केंद्र बंद झाल्याने शिल्लक धानाची विक्री नाइलाजाने कमी दरात व्यापाऱ्यांना करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. परिणामी, शासनाने या धानाची खरेदी करावी अथवा शक्य नसल्यास नोंदणीकृत शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 


इतर बातम्या
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे ...येवला, जि. नाशिक : कृषी बियाणे रासायनिक खते,...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करा ः...नागपूर : गेल्या वर्षीचा महापूर लक्षात घेऊन...
कुकडीच्या पाण्यासाठी  पारनेरकर एकवटले निघोज, ता. पारनेर : कुकडीच्या पाण्याबाबत पुणे...
पेट्रोल, खतांच्या दरवाढीविरोधात ...मुंबई : पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने...
गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांकडे नऊ टन...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात...
कीटकनाशके विक्रीबाबत तरतुदींचे पालन करा अकोला ः या खरीप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके...
परभणीत पीककर्जाच्या उद्दिष्टात ४८६...परभणी ः जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२)...
कोरोना रुग्णालयांचा वीज,  ऑक्सिजन...मुंबई : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे...
मॉन्सूनपूर्व कामांना प्राधान्य द्यावे ः...भंडारा : मॉन्सून कालावधीत अचानक उद्‌भवणाऱ्या...
कोरोनाचे नियम पाळून  बाजार समित्या सुरू...नाशिक : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव...
नगर जिल्ह्यात खरीपपूर्व मशागतीच्या...नगर : एकीकडे कोरोनाचे सावट असताना ग्रामीण भागातील...
लोहा, माहूर तालुक्यांना विम्याची रक्कम...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...