Agriculture news in marathi To buy grain in the storehouse Received extension | Agrowon

भंडाऱ्यात धान खरेदीला मिळाली मुदतवाढ

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 जुलै 2021

गोदाम आणि बारदाण्याच्या तुटवड्याने धान खरेदीवर परिणाम झाल्याने अनेक शेतकऱ्यांना धानाची हमीभावाने विक्री करता आली नाही. त्यातच मुदत संपल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.

भंडारा : गोदाम आणि बारदाण्याच्या तुटवड्याने धान खरेदीवर परिणाम झाल्याने अनेक शेतकऱ्यांना धानाची हमीभावाने विक्री करता आली नाही. त्यातच मुदत संपल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. आता शासनाने धान खरेदीला गुरुवारपर्यंत (ता.२२) मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

गोदामाच्या अभावामुळे खरीप हंगामातील धान खरेदी प्रभावीत झाली होती. त्यातच मिलर्सनी भरडाई दरात वाढीच्या मागणीसाठी भरडाई न करण्याचे जाहीर केले. परिणामी गेल्या खरिपातील धान गोदामातच पडून होते. याचा थेट परिणाम रब्बी हंगामातील धान खरेदीवर झाला. तब्बल वीस दिवस उशिराने धान खरेदी सुरू झाली.

सुरुवातीला ३० जूनपर्यंत खरेदीची मुदत होती. परंतु धानाची संपूर्ण खरेदी झाली नाही. त्यामुळे १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या काळात बारदाण्याअभावी धान खरेदी ठप्प झाली. अनेक शेतकऱ्यांना आपला धान विकता आला नाही. त्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी केली जात होती. आमदार डॉ. परिणय फुके यांनी या प्रश्‍नी सहकारमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांची भेट घेतली होती. धान खरेदीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी त्यांनी केली होती. दरम्यान, धान खरेदीला गुरुवारपर्यंत (ता. २२) वाढ देण्याचे आदेश शासनाने काढले आहेत.

  नोंदणीकृत शेतकऱ्यांचाच धान होणार खरेदी 
शासनाने विविध कारणांमुळे धान खरेदी रखडल्याच्या मुद्याची दखल घेत धान खरेदीला मुदतवाढ दिली आहे. मात्र नवीन शेतकऱ्यांची नोंदणी न करण्याचे या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. केवळ ३० जूनपर्यंत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचाच धान खरेदी करण्यात येणार आहे. उघड्यावर धानाचा साठा ठेवू नये, गोदामाच्या उपलब्धतेचा विचार करूनच ही खरेदी करण्यात यावी, असेही आदेशात नमूद आहे.


इतर ताज्या घडामोडी
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...
कोल्हापूर : पीकविम्याच्या ऑनलाइन...कोल्हापूर : विमा योजनेत सहभागाबाबतीत राज्यात...
नाशिक : पीकविम्याबाबत तक्रारींचा पाढानाशिक : पीकविमा कंपन्यांची असक्षम यंत्रणा......
सिंधुदुर्गात कार्यालय; पण शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरी : विमा कंपनीचे सिंधुदुर्गनगरी येथे...
रत्नागिरी : पूरबाधित शेतकऱ्यांची...रत्नागिरी : जिल्ह्यातील नदी किनारी भागात पुरामुळे...
नांदेडमध्ये विमा कंपनीचे जिल्ह्याच्या...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यासाठी...
नगर : विमा कार्यालय, हेल्पलाइन नंबरची... नगर : नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी,...
कोल्हापूर : पूर फुटाने वाढला, इंचाने...कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत...
राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे...मुंबई : राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे...
विमा कंपनीचा कारभार चालतोय कृषी...सातारा : जिल्ह्यात खरिपाच्या सुरूवातीस पावसाने...
चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी पुनर्वसन...रत्नागिरी : ढगफुटीसदृश पावसामुळे चिपळूणकरांचे...
पाणी ओसरताच तातडीने पंचनामेकोल्हापूर : पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत राज्य...
शेतकरी नियोजन पीक : कांदाशेतकरी : नंदकुमार काशिनाथ उशीर गाव : धोडंबे, ता...