agriculture news in marathi Buy kharif season maize in Nashik with Rabbi | Agrowon

रब्बीसोबत नाशिकमधील खरीप हंगामातील मका खरेदी करा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

फक्त रब्बी हंगामातील मका खरेदीचे आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्याकडे ९० टक्के मका मागील खरीप हंगामातील आहे. रबी हंगामात अत्यल्प मका आहे. तो अद्याप काढलेला नाही. त्यामुळे खरीब, रब्बी असा भेदभाव न करता सरसकट खरेदी करून मका उत्तपादकांना न्याय द्यावा. 
- कुबेर जाधव, समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना, नाशिक 

अतिवृष्टीमुळे खरिपातील मका सोंगणीला उशीर झाला. त्यामुळे आता मळणी करून मका तयार आहे. मात्र, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे खरेदी केंद्रावर विक्री करता येईना. सरकारने तातडीने खरीप मका खरेदीचा निर्णय घेऊन खरिपाच्या तोंडावर दिलासा द्यावा. 
- किरण लभडे, मका उत्पादक शेतकरी, निमगाव मढ, ता. येवला 
 

नाशिक : २०१९-२० च्या रब्बी हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत ज्वारी व मका खरेदीसाठी जिल्ह्यात ९ खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या कामी जिल्ह्यातील खरेदी विक्री संघ काम पाहतील. ही खरेदी ११ मे ते ३० जून दरम्यान होणार असल्याची घोषणाही झाली. मात्र, गेल्या दोन दिवसांपूर्वीच ऑनलाइन पद्धतीने पोर्टलवरून नोंदणीला सुरुवात झाली. जिल्हा विपणन अधिकारी संध्या पांडव यांनी दिलेल्या माहितीनुसार अवघ्या ९० शेतकऱ्यांनी विक्रीसाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे प्रतिसाद अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे. 

शासन निर्णयानुसार एफ.ए.क्यू दर्जाच्या खरेदी होणाऱ्या मक्याला प्रतिक्विंटल १७६० रुपये दर जाहीर करण्यात आले. मात्र, यात रब्बी हंगामातील मका खरेदी होणार आहे. खरिपातील पडलेल्या मक्याचे काय करावे, हा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. प्रामुख्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खरीप हंगामातील मका शिल्लक आहे. तो खरेदी करण्याची प्रमुख मागणी आहे. मात्र, निर्णय फक्त रब्बी हंगामातील मका खरेदीचा असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. 

खरीप हंगामातील शिल्लक मका नोंदणीसाठी शेतकरी केंद्रावर येत आहेत. ही टक्केवरी ९० टक्के, तर रब्बीत नोंदणी करण्यासाठी येणाऱ्यांची टक्केवारी अवघी १० टक्के आहे. याबाबत येवला खरेदी विक्री संघाकडे चौकशी केली असता ५० टक्के खरीप मका विक्रीविना असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शासनाने मका उत्पादक शेतकऱ्यांची मागणी विचारत घ्यावी, असे शेतकऱ्यांनी सांगितले. 

 


इतर ताज्या घडामोडी
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...