agriculture news in marathi, Buy at a lower rate than Mung, Udda | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी सुरू आहे. हमीभावापेक्षा कमी दराने खरेदीसाठी शेतकऱ्यांकडून संमतीपत्र भरुन घेतले जात आहे. शासकीय खरेदी सुरू नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरूच आहे.

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी सुरू आहे. हमीभावापेक्षा कमी दराने खरेदीसाठी शेतकऱ्यांकडून संमतीपत्र भरुन घेतले जात आहे. शासकीय खरेदी सुरू नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरूच आहे.

नांदेड जिल्ह्यात मुगाची २६ हजार ४५१ हेक्टरवर पेरणी झाली होती. सोळापैकी नांदेड आणि हदगाव तालुकेवगळता अन्य १४ तालुक्यांतील उत्पादकता प्रतिहेक्टरी सरासरी ४ क्विंटल ९५ किलो आल्याचे स्पष्ट झाले. नांदेड जिल्ह्यात उडदाची २९ हजार ५२० हेक्टरवर पेरणी झाली होती. नांदेड आणि हदगाव तालुके वगळता उर्वरित १४  तालुक्यांतील उडदाची सरारी उत्पादकता प्रतिहेक्टरी ५ क्विंटल ३० किलो म्हणजेच एकरी २ क्विंटल १२ किलो असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नांदेड बाजार समितीत यंदा गुरुवारपर्यंत (ता. ११) मुगाची २६ क्विंटल खरेदी झाली. मुगाला प्रतिक्विंटल ३५०० ते ४५०० रुपये दर मिळाला. उडदाची २५ क्विंटल खरेदी झाली आहे. उडदाला
प्रतिक्विंटल ३१०० ते ३३०० रुपये दर मिळाला.

गतवर्षी (२०१७ मध्ये) नांदेड बाजार समितीमध्ये मूगाची एकूण १७५३ क्विंटल खरेदी झाली होती. त्या वेळी मुगाला ४००० ते ४५०० रुपये दर मिळाले होते. उडदाची ११३ क्विंटल खरेदी झाली होती. उडदाला प्रतिक्विंटल २००० ते ४६५० रुपये दर मिळाले होते.

परभणी, हिंगोलीतील आवक
परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारपर्यंत (ता. ११) मुगाची एकूण ८७५ क्विंटल खरेदी झाली. मुगाला प्रतिक्विंटल ३५०० ते ४९५० रुपये दर मिळाले. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारपर्यंत (ता. ११) मुगाची एकूण १ हजार ६९१ क्विंटल खरेदी झाली. मुगाला प्रतिक्विटंल ३२८० ते ३६०० रुपयांपर्यंत दर मिळाले. उडदाची एकूण १ हजार ७०९ क्विंटल खरेदी झाली आहे. उडदाला प्रतिक्विंटल ३०५० ते ३७०० रुपये दर मिळाले.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...