सटाणा येथे मका खरेदी, विक्रीचे कामकाज सुरू

नाशिक : राज्य शासनातर्फे किमान आधारभूत किंमत खरेदीअंतर्गत मका खरेदी-विक्री केंद्र सटाणा येथे सटाणा दक्षिण भाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीद्वारे सुरू झाले आहे. या केंद्रावर आत्तापर्यंत २६२ क्विंटल मका खरेदी झाली आहे. जिल्ह्यातील एकूण ९ केंद्रपैकी हे मका खरेदी कामकाज सुरू करणारे पहिले केंद्र ठरले आहे.
 Buy maize at Satana, Sales resume

जिल्हयात एकूण ९ मका खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यापैकी इतर ठिकाणी खरेदी विक्री संघ, शेतकी संघांद्वारे होत आहेत. या ठिकाणी सटाणा दक्षिण भाग सोसायटीद्वारे खरेदी सुरू आहे. सन २०१९-२० रब्बी हंगामासाठी आधारभूत दर प्रतिक्विटंल १७६० रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. 

केंद्राचे उदघाटन राज्य वखार महामंडळाच्या परिसरात तहसिलदार जितेंद्र इंगळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, सहायक निबंधक महेश भंडागे, उपाध्यक्ष द्वारकाबाई सोनवणे, बाजार समितीचे माजी सभापती भिका सोनवणे आदी उपस्थित होते. 

केंद्रावर कार्यालयात सातबारा उतारा, आधारकार्ड, बँकेचे पासबुक देणे आवश्यक आहे. मका खरेदीसाठी एकरी मर्यादा १२ क्विटंल करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष मनोहर देवरे यांनी दिली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com