सहलींच्या बचत निधीतून होणार आंबा फवारणी यंत्र खरेदी

रत्नागिरीत शेतकरी सहलींच्या बचत निधीतून होणार आंबा फवारणी यंत्र खरेदी
रत्नागिरीत शेतकरी सहलींच्या बचत निधीतून होणार आंबा फवारणी यंत्र खरेदी

रत्नागिरी : ग्रास कटर, आंबा फवारणी मशिनला जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मागणी आहे. त्यामुळे जिल्ह्यातून अधिक प्रस्ताव आले होते. निधीअभावी सर्वांनाच लाभ देता आला नाही. हे लक्षात घेऊन २०१९-२० या आर्थिक वर्षात शेतकरी सहलींसाठी गतवर्षीच्या तुलनेत कमी तरतूद केली आहे. त्यात बचत झालेल्या निधीचा वापर यंत्र खरेदीसाठी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा परिषद कृषी समितीत घेण्यात आला आहे.

कृषी व पशू समितीची उपाध्यक्ष संतोष गोवळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कृषी विभागाचा १ कोटी २९ लाखाचा मंजूर निधी शंभर टक्के खर्च करण्यात यश आले आहे. शेती अवजारांसाठी अधिक अर्ज शेतकऱ्यांकडून आले होते. त्यांना पुढील वर्षाच्या निधीतून प्राधान्याने अवजारे दिली जातील, असे आश्‍वासन गोवळे यांनी दिले आहे.

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्यावर भर असल्याचे या वेळी सांगितले. अभ्यास दौऱ्यांसाठी शेतकऱ्यांची सहल आयोजित केली जाते. गतवर्षी यावर साडेनऊ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. 

त्याऐवजी पाच लाख रुपयेच ठेवण्याचा निर्णय या वेळी कृषी समितीत घेतला आहे. शेतकऱ्यांना अभ्यासाबरोबरच साहित्यांची गरजही अधिक असते. अनेक प्रस्ताव निधी अभावी पडून आहेत. सहलींवरील खर्च वाचवून त्याचा उपयोग अवाजारांसाठी केला जाणार आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आल्यामुळे २०१९-२० या आर्थिक वर्षाचा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. दोन महिन्यांनी विधानसभेची आचारंसहिता आहे. 

त्यापूर्वी आराखड्यांना मंजुरी देण्यात येणार आहे. ग्रास कटर, आंबा फवारणी मशीनला अधिक प्रस्ताव आले आहेत. निधी अभावी त्यांना लाभ देता आला नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com