agriculture news in marathi, Buy only five hundred quintals at the guarantee center | Agrowon

नगरच्या हमीभाव केंद्रांवर अवघी ५०० क्विंटल खरेदी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी करण्यासाठी नगर जिल्ह्यामध्ये शासनाने नऊ हमी केंद्रे सुरू केली खरी, मात्र यंदा पहिल्यांदाच या हमी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. आतापर्यंत ८ हजार ३७३ शेतकऱ्यांनी विक्री करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली. मात्र, आतापर्यंत अवघ्या २२२ शेतकऱ्यांनी मूग, उडिदाची विक्री केली आहे. विशेष म्हणजे यंदा सोयाबीनची खरेदीच झाली नाही. माल विक्रीला आणा, असा संदेश देऊनही शेतकऱ्यांनी हमी केंद्राकडे पाठ फिरवल्याने प्रशासन अक्षरशः हतबल झाले आहे. खरेदी करण्याच्या अटीमुळेच पाठ फिरवली असल्याचे बोलले जात आहे.

नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी करण्यासाठी नगर जिल्ह्यामध्ये शासनाने नऊ हमी केंद्रे सुरू केली खरी, मात्र यंदा पहिल्यांदाच या हमी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. आतापर्यंत ८ हजार ३७३ शेतकऱ्यांनी विक्री करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली. मात्र, आतापर्यंत अवघ्या २२२ शेतकऱ्यांनी मूग, उडिदाची विक्री केली आहे. विशेष म्हणजे यंदा सोयाबीनची खरेदीच झाली नाही. माल विक्रीला आणा, असा संदेश देऊनही शेतकऱ्यांनी हमी केंद्राकडे पाठ फिरवल्याने प्रशासन अक्षरशः हतबल झाले आहे. खरेदी करण्याच्या अटीमुळेच पाठ फिरवली असल्याचे बोलले जात आहे.

शेतकऱ्यांच्या मालाची हमीदरानुसार खरेदी करणे बंधनकारक असताना व्यापारी कमी दराने खरेदी करत असल्याने मूग, उडीद, सोयाबीनसह अन्य शेतमालाची हमीदराने खरेदी करण्यासाठी जिल्ह्यामध्ये हमी केंद्रे सुरू झाली. यंदा त्यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने कृषी विभागाकडून उत्पादनाच्या शक्‍यतेची माहिती घेऊन खरेदी केंद्रे सुरू करण्याचे वरिष्ठांना कळवले होते.

त्यानुसार कर्जत, जामखेड, नगर, नेवासा, राहाता, राहुरी, पारनेर, श्रीरामपूर, श्रीगोंदा, नेवासा येथे खरेदी केंद्रे सुरू करण्याची दोन-अडीच महिन्यांपूर्वी मागणी केली होती. त्यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन नोंदणी करून घेतली. नोंदणीला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याने सातत्याने मुदतवाढ करावी लागली होती. मात्र, सुरवातीला मागणी सातत्याने हमी केंद्राबाबत मागणी होत असताना, आता मात्र हमी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

जिल्हामध्ये नऊ ठिकाणी हमी केंद्रे सुरू केल्याचे जाहीर करण्यात आले असले, तरी आतापर्यंत फक्त चार केंद्रावरच मूग, उडिदाची खरेदी झाली आहे. सोयाबीनची तर एकाही क्विंटलची खरेदी झाली नाहीत, असे सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी हमी केंद्रावर मूग, उडीद खरेदीसाठी आणावेत, असे अावाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी भारत पाटील यांनी केले आहे.

‘एसएमएस’ देऊन शेतकरी फिरकेनात
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ८ हजार ३७३ शेतकऱ्यांनी विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली. आतापर्यंत तीन वेळा नोंदणीला मुदतवाढ मिळाली. अजूनही ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी सुरू आहे. आतापर्यंत मुगाची विक्री करण्यासाठी १६१६, उडिदासाठी ६ हजार ५७८, सोयाबीनसाठी १७९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यातील जवळपास पाच हजार शेतकऱ्यांनी माल विक्रीला आणावा, यासाठी एसएमएस (मोबाईल संदेश) दिले आहे. मात्र, शेतकरी हमी केंद्राकडे फिरकायला तयार नाहीत.

शासनाने मुळात खरेदी केंद्रे सुरू करण्याला उशीर केला. त्यात खेरदी करण्यासाठी ज्या अटी घातल्या त्या किचकट आहेत. पैसेही वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे मानसिक त्रास सोसण्यापेक्षा विक्रीच करायची नको, अशी भूमिका घेतलेली दिसते. शासनाचीच याबाबत उदासीनता दिसते.
- बाळासाहेब पटारे, विभागीय अध्यक्ष, शेतकरी संघटना

 


इतर ताज्या घडामोडी
अकोले तालुक्यात भात लागवडीचे प्रमाण कमीचनगर  : अकोले तालुक्यात अद्यापपर्यंत जोरदार...
बियाणे उगवणीबाबत नगरमध्ये ७६८ तक्रारीनगर  ः सोयाबीन, बाजरीच्या निकृष्ट...
लोणावळा येथे सर्वाधिक पावसाची नोंदपुणे  ः पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागात...
मुंबई, ठाण्यात पावसाचा जोरमुंबई  : मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीत...
म्हैसाळ योजनेची दोन कोटींची पाणीपट्टी...सांगली  : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी...
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा कमी जोररत्नागिरी  ः जिल्ह्यात शनिवारी (ता.४) जोरदार...
भिवापुरी मिरचीच्या उत्पादकता वाढीसाठी...नागपूर  : भौगोलिक मानांकन मिळालेल्या आणि...
आधुनिक कृषी तंत्रज्ञान बांधापर्यंत...यवतमाळ : कृषीविषयक तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार...
महागाव तालुक्यात अल्प पावसामुळे पिकांची...अंबोडा, जि. यवतमाळ  ः महागाव तालुक्यात...
भंडारदरा परिसरात आढळला घोयरा सरडा अकोले, जि. नगर ः घोयरा सरडा अर्थातच श्यामेलिएओन...
खरिपातील धानाला देणार २५०० रुपयांचा दर...भंडारा  ः केंद्र सरकारकडून धानाला हमीभाव...
नांदेड जिल्ह्यात ८० टक्के क्षेत्रावर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामात ६ लाख ८९५...
नांदेड जिल्ह्यात हरभऱ्याची सव्वा लाख...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
पुण्यात भाजीपाल्याची आवक वाढली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
आर्क्टिक वनस्पती कर्ब शोषण्यापेक्षा...आर्क्टिक प्रदेशामध्ये वाढणाऱ्या उंच झाडे किंवा...
कोरडवाहू कपाशीचे लागवड नियोजनअयोग्य जमिनीवरील बीटी कपाशीची लागवड, लागवडीचे...
मराठवाड्यात पावसाचा जोर कमीऔरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत...
बियाण्यांच्या अडीच हजारांवर तक्रारींची...बीड : उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट...
नांदेड जिल्ह्यासाठी खरीप पीकविमा योजना...नांदेड : जिल्ह्यात यंदासाठी (२०२०-२१) खरीप हंगाम...
सततच्या खंडित वीजपुरवठ्याने माळीनगर...माळीनगर, जि. सोलापूर : वारंवार खंडित...