परभणी जिल्ह्यात एक लाख १७ हजार टन खतसाठा मंजूर

परभणी ः ‘‘जिल्ह्याला यंदाच्या (२०२१) खरीप हंगामासाठी रासायनिक खतांच्या विविध ग्रेडचा १ लाख १७ हजार ८८० टन खतसाठा मंजूर झाला’’, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे यांनी दिली.
Buying in Mohol, Corona testing mandatory for sellers
Buying in Mohol, Corona testing mandatory for sellers

परभणी ः ‘‘जिल्ह्याला यंदाच्या (२०२१) खरीप हंगामासाठी रासायनिक खतांच्या विविध ग्रेडचा १ लाख १७ हजार ८८० टन खतसाठा मंजूर झाला’’, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे यांनी दिली.

यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी  विभागातर्फे रासायनिक खतांच्या विविध ग्रेडच्या १ लाख ५४ हजार २०० टन खतांची मागणी करण्यात आली. परंतु कृषी आयुक्तालयाने १ लाख १७ हजार ८८० टन खतसाठा मंजूर केला आहे. यंदा मागणीच्या तुलनेत युरिया, एनपीके या खतांचा साठा कमी मंजूर केला आहे. तर सुपर फॉस्फेट, पोटॅश, डीएपी खतांचा मागणी पेक्षा जास्त साठा मंजूर केला आहे. 

एक एप्रिलपर्यंत जिल्ह्यात १४ हजार ६५० टन खतसाठा उपलब्ध होता. यंदाच्या खरीप हंगामात गुरुवार (ता.१५) पर्यंत २४ हजार २६० टन खतांचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे खतांची एकूण उपलब्धता ३८ हजार ९१० टन झाली आहे. आजवर १ हजार ३८४ टन खतांची विक्री झाली. त्यामुळे ३७ हजार ५२६ टन खतसाठा शिल्लक आहे. त्यात युरिया ८ हजार ६०५ टन, डीएपी ३ हजार ५३ टन, पोटॅश १ हजार ७१७ टन, एनपिके १७ हजार ६८ टन, सुपर फॉस्फेट ७ हजार ८३ टन खतांचा समावेश आहे.

खरीप खतसाठा स्थिती (टनांत)

खताचा प्रकार      मागणी मंजूर खतसाठा
युरिया ६०५०० ३६२४०
सुपर  फॉस्फेट १२००० १३८२०
पोटॅश ६०००  ६२९०
डीएपी २२५०० २६४६०
एनपीके ५३२०० ३५०७०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com