व्यापाऱ्यांकडून मुगाची कमी भावाने खरेदी

व्यापाऱ्यांकडून मुगाची कमी भावाने खरेदी
व्यापाऱ्यांकडून मुगाची कमी भावाने खरेदी

नांदुरा, जि. बुलडाणा : पावसाने उघडीप दिल्याने मळणी झालेला मूग मोठ्या प्रमाणावर बाजारात विक्रीसाठी येत आहे. मात्र, या मुगाची व्यापाऱ्यांकडून कमीदराने खरेदी केली जात असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. 

नांदुरा तालुक्यात मुगाची शासकीय खरेदी होत नसल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नाईलाजाने कमी दराने का होईना मूग खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत असल्याचे विदारक चित्र आहे. गत दोन वर्षांपासून परिसरातील पर्जन्यमान घटल्याने शेती उत्पादनातून घर खर्च चालवणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. यंदा तर पेरण्या झाल्यावर पावसाचे जोरदार आगमन झाल्याने खरिपातील पीक अडचणीत सापडले आहे. मागील आठवड्यात दमदार झालेल्या पावसाने पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तरी सततच्या पावसामुळे पिकांची प्रचंड प्रमाणात वाढ खुंटली आहे. 

अशा परिस्थितीत थोड्या फार प्रमाणात हाती आलेल्या मुगाला सतत कमी भाव मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मुगास नेहमी भाव कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मुगाची स्वतंत्र पेरणी न करता इतर पिकात आंतरपीक म्हणून लागवड केली. कमी कालावधीत मुगाचे उत्पादन निघते, त्यामुळे शेतकऱ्यांचे ते नगदी पीक म्हणूनही ओळखले जाते. परंतु याच नगदी पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मेहनत व पैसा वाया जात आहे.

शेतकऱ्याच्या मुगाला आज रोजी व्यापाऱ्यांकडून चक्क ४ हजार ६०० रुपये ते ४ हजार ९०० रुपयांच्या आसपास दर दिले जात आहेत. वास्तविक पाहता केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने मुगाच्या हमीभावात ७५ रुपयांनी वाढ करून २०१९-२० च्या खरीप हंगामात ७०५० रुपये प्रतिक्विंटल दर केले आहे. 

याचे परिपत्रक कृषी उत्पन्न बाजार समित्यांना मिळाले असे तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकरी हमीभावापासून वंचित आहे. व्यापाऱ्यांनी बाजार समिती यार्डात व्यवसाय केल्यास बाजार समितीकडून त्यांना पावती पुस्तके दिली जातात. एखाद्याने हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केल्यास शेतकऱ्याने त्याची पावती घ्यावी त्या आधारे त्यांच्यावर बाजार समितीकडून कारवाई केली जाते. बाजारात व्यापाऱ्याकडून कमी दराने मुगाची खरेदी केली जात असल्याने बाजार समितीने शासकीय खरेदी सुरू करणे गरजेचे आहे.

व्यवहाराची शेतकऱ्यांना मिळेना पावती  बाजार समितीकडून खासगी व्यापाऱ्यांना धान्य खरेदी विक्रीचे परवाने दिले जातात. असेच व्यापारी व्यवसाय करू शकतात. परंतु व्यापारी कुठेही दुकान मांडून आपल्या तुंबड्या भरीत आहे. तर झालेल्या व्यवहाराची ग्राहकांना पावती सुद्धा देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com