Agriculture news in marathi, Cabbage in Aurangabad with 1000 to 1200 rupees per quintal | Agrowon

औरंगाबादेत कोबी १००० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल
टीम अॅग्रोवन
रविवार, 29 सप्टेंबर 2019

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २८) कोबीची ९० क्‍विंटल आवक झाली. तिला १००० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २८) कोबीची ९० क्‍विंटल आवक झाली. तिला १००० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची १५९ क्विंटल आवक झाली. तिला ७०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. कांद्याची आवक ५७७ क्‍विंटल, तर दर १००० ते ३३५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ५१ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लॉवरला १६०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. वांग्याची आवक ४६ क्‍विंटल, तर दर ५०० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ४३ क्विंटल आवक झालेल्या काकडीला ६०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. भेंडीची आवक २१ क्‍विंटल झाली. तिला १२०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २३ क्‍विंटल आवक झालेल्या लिंबाचे दर ३५०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. 

शेवग्याची २५ क्‍विंटल आवक झाली. त्याला १६०० ते ५००० रुपये प्रतिक्‍वंटलचा दर मिळाला. दुधी भोपळ्याची आवक ५ क्‍विंटल, तर दर ६०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ५५ क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळी मिरचीला ८०० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ४ क्‍विंटल आवक झालेल्या चवळीला १६०० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ४ क्‍विंटल आवक झालेल्या वालशेंगांचे दर १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. 

कारल्याची २८ क्‍विंटल आवक झाली. त्याला १३०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १३९ क्‍विंटल आवक झालेल्या मक्याला ५०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. मोसंबीची आवक ३१ क्‍विंटल, तर दर १००० ते ४८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा मिळाला. ५२ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाला ५०० ते ९००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३० क्‍विंटल आवक झालेल्या काशिफळाचे दर ५०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. 

संत्र्यांची २४ क्‍विंटल आवक झाली. त्याचे दर १८०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. मेथीची आवक ८५०० जुड्यांची झाली. तिला ५०० ते ८०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. ७३०० जुड्यांची आवक झालेल्या पालकाचे दर ३०० ते ५०० रुपये प्रतिशेकडा राहिले. १४ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीला ४५० ते ७०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

इतर बाजारभाव बातम्या
जळगावात कोबी १५०० ते २८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
सोलापुरात कोथिंबीर, मेथी, शेपूला उठावसोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
औरंगाबादेत लिंबांना ३५०० ते ४००० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोयाबीनची आवक सुरूनागपूर : बाजारात हंगामातील नव्या सोयाबीनची आवक...
गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक आणि मागणी...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत ढोबळी मिरची ३००० ते ३२००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत वांगी प्रतिक्विंटल २००० ते ३०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
‘मार्केट यार्डातून हळद न उचलणाऱ्या...हिंगोली : ‘‘हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
राज्यात सोयाबीन २३५० ते ३९०० रुपये...नांदेड, परभणीत ३१५० ते ३४५० रुपयांचा दर नांदेड...
जळगावात वांगी १४०० ते २८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
जळगाव बाजार समितीत मुगाचे दर टिकूननगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या...
नाशिकमध्ये आल्याच्या आवकेत वाढ, दरातही...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
सोलापुरात टोमॅटो, बटाटा तेजीतसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
गाजराच्या दरात सुधारणा; दुधी भोपळ्यात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये हिरवी मिरची ८०० ते १४००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भुईमूग प्रतिक्विंटल ४००० ते ६०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
बऱ्हाणपुरात केळीला २३०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः मध्य प्रदेशात केळीची काढणी जवळपास संपली...
राज्यात कांदा १२०० ते ३६०० रुपये...पुण्यात मागणीत घट, दरही कमी पुणे : केंद्र...
सोलापुरात टोमॅटो २०० ते २५०० रुपये...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
जळगावात मेथी २००० ते ३४०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.१...