औरंगाबादमध्ये कोबी, वांगी, आले दर स्थिर

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्यात कोबी, वांगी, आल्याचे दर स्थिर होते. तर, हिरवी मिरची, भेंडी, लिंबू दरात चढउतार पाहायला मिळाला.
Cabbage in Aurangabad, Eggplant, ginger rates stable
Cabbage in Aurangabad, Eggplant, ginger rates stable

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्यात कोबी, वांगी, आल्याचे दर स्थिर होते. तर, हिरवी मिरची, भेंडी, लिंबू दरात चढउतार पाहायला मिळाला.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ११ ते १६ ऑक्टोबर दरम्यान वांग्यांची ७६ क्विंटल आवक झाली. १३ ते १७ क्विंटल दरम्यान आवक झालेल्या वांग्यांना २६०० ते ३१०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान सरासरी दर मिळाला. कोबीची ३८९ क्विंटल आवक झाली. ४६ ते १६९ दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या या कोबीचे सरासरी दर ४०० ते ६५० रुपये राहिले.

आल्याची आठवड्यात केवळ तीन वेळा मिळून २९९ क्विंटल आवक झाली. २२ ते २५२ क्विंटल दरम्यान आवक झालेल्या या आल्याचे सरासरी दर १००० ते १२५० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहिले. 

हिरव्या मिरचीची १९४ क्विंटल आवक झाली. २८ ते ४८ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या या हिरव्या मिरचीला सरासरी १८५० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. भेंडीची ९१ क्विंटल आवक झाली. १३ ते २८ क्विंटल दरम्यान आवक झालेल्या या भेंडीला सरासरी २२५० ते ३४०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. 

लिंबूची ६६ क्‍विंटल आवक झाली. या लिंबूला सरासरी १७५० ते २२५० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. शेवग्याची आवक नगण्यच राहिली. आठवड्यात ४ ते ३० क्विंटल दरम्यान केवळ तीन वेळा मिळून ४२ क्विंटल आवक झालेल्या शेवग्याला सरासरी ४२५०  ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात  आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com