जळगावात कोबी १५०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटल

जळगावात कोबी १५०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटल
जळगावात कोबी १५०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटल

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. १५) कोबीची १५ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १५०० ते २८०० रुपये मिळाला. आवक धुळे, औरंगाबादमधील सोयगाव, नाशिक जिल्ह्यातून झाली. आवक सुमारे दोन महिन्यांपासून कमी असून, दर स्थिर आहेत, अशी माहिती मिळाली. 

बाजारात वांग्यांची ११ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १६०० ते ३१०० रुपये दर मिळाला. मेथीची सहा क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २००० ते ३४०० रुपये दर होता. शेवग्याची अडीच क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १४५० ते २६०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची १५ क्विंटल आवक झाली. तिला ७५० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. बिटची पाच क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाला. गवारीची दोन क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २४०० ते ४४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. संकरित गवारीचे दर कमाल २४०० पर्यंत राहिले. 

लिंबांची चार क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २२०० ते ३२५० रुपये दर होता. आल्याची २१ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २१०० ते ५२०० रुपये दर मिळाला. बटाट्याची ३१२ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ७५० ते १२५० रुपये दर होता. भेंडीची १२ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १२०० ते १६०० रुपये मिळाला. काशीफळाची २५ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये होता.  

हिरव्या मिरचीची ३१ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ९०० ते १४०० रुपये दर मिळाला. डाळिंबांची १६ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २५०० ते ५१५० रुपये दर मिळाला. गाजराची १२ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची १६ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ९०० ते १६०० रुपये दर होता. पालकाची दोन क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १२०० रुपये मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com