सोलापुरात कारले, वांगी, कोबीचे दर टिकून

सोलापुरात कारले, वांगी, कोबीचे दर टिकून
सोलापुरात कारले, वांगी, कोबीचे दर टिकून

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कारले, वांगी आणि कोबीची आवक कमी राहिली. पण मागणी असल्याने दर टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कारल्याची आवक रोज २० ते ३० क्विंटल, वांग्याची १०० ते २०० क्विंटल आणि कोबीची १० ते ४० क्विंटल अशी आवक राहिली. त्यांची सगळी आवक स्थानिक भागातूनच राहिली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची आवक कमीच आहे. पण मागणी असल्याने उठाव मिळतो आहे. कारल्याला प्रतिक्विंटलला किमान २००० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये, वांग्याला किमान ४०० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये तर कोबीला किमान ६०० रुपये, सरासरी ९०० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपये असा दर मिळाला. 

फ्लॉवर आणि हिरव्या मिरचीलाही या सप्ताहात चांगला उठाव मिळाला. पण त्यांचीही आवक कमीच होती. फ्लॉवरची एक ते दोन गाड्या आणि हिरव्या मिरचीची जवळपास ५० ते ७० क्विंटलपर्यंत आवक राहिली. फ्लॉवरला प्रतिक्विंटलला १००० ते १५०० रुपये आणि हिरव्या मिरचीला किमान १८०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये असा दर मिळाला. टोमॅटोच्या दरात मात्र फारशी सुधारणा झाली नाही. त्याचे दर ‘जैसे थे’ राहिले. टोमॅटोची आवक १०० ते २०० क्विंटलपर्यंत रोज होती. टोमॅटोला प्रतिक्विंटलला किमान ३०० रुपये, सरासरी ७०० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपये असा दर मिळाला.

कोथिंबीर, मेथीला उठाव भाजीपाल्यामध्ये कोथिंबीर, मेथीला चांगली मागणी राहिली. या सप्ताहात भाज्यांची आवक मात्र काहीशी कमी झाली. रोज किमान १५०० ते ५ हजार पेंढ्यांपर्यंत एवढीच आवक होत राहिली; पण मागणीमुळे दरातील तेजी कायम राहिली. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी ८०० ते १२०० रुपये, मेथीला ३५० ते ६०० रुपये, शेपू ३०० ते ५५० रुपये आणि चुका, पालकाला प्रत्येकी ३०० ते ४०० रुपये असा दर मिळाल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com