औरंगाबादेत कोबी १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल

औरंगाबादेत कोबी १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल
औरंगाबादेत कोबी १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.६) कोबीची १४७  क्‍विंटल आवक झाली. तिला १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची १९९ क्‍विंटल आवक झाली. तिला ४५०० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ६७२ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर ५०० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १९७ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला ७५० ते ९५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३९ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लॉवरचे दर २५०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ४३ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याचा दर १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १४ क्‍विंटल आवक झालेल्या गवारला ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. काकडीची आवक ३४ क्‍विंटल व आवक १००० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

भेंडीची आवक ११२ क्‍विंटल झाली. या भेंडीला १००० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २० क्‍विंटल आवक झालेल्या लिंबाचे दर १५०० ते ३२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. शेवग्याची आवक ५ क्‍विंटल, तर दर ३००० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ११० क्‍विंटल आवक झालेल्या आंब्याचे दर ३००० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. दुधी भोपळ्याची आवक ९ क्‍विंटल, तर दर ५०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ३५ क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीला २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

चवळीची आवक १३ क्‍विंटल, तर दर १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ६३ क्‍विंटल आवक झालेल्या कैरीचे दर २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २० क्विंटल आवक झालेल्या कारल्याला ३००० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.  मक्याची आवक ८ क्‍विंटल; तर दर ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १४ क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीचे दर १६०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. डाळिंबाची आवक २० क्‍विंटल; तर दर ५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ८ क्‍विंटल आवक झालेल्या जांभळाला २५०० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

डांगराची आवक ३० क्विंटल; तर दर ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १५ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीला ८०० ते १५०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com