साखर उद्योगाने मूल्यपदार्थांकडे वळणे आवश्यक: कृषिमुल्य आयोग

VSI Anniversary programme
VSI Anniversary programme

पुणे: देशाच्या ग्रामीण अर्थकारणात मोलाचा वाटा असल्यानेच केंद्र शासनाकडून साखर उद्योगाच्या बळकटीकरणासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. तथापि, साखर उद्योगासमोर मोठी आव्हाने आहेत. त्यामुळे शेतकरी केंद्रबिंदू ठेवत यापुढे केवळ साखर निर्मितीवर अवलंबून न राहता इतर पर्याय शोधावेच लागतील. साखरेकडून इतर मूल्य पदार्थांकडेदेखील वळले पाहिजे,” असा सल्ला राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष प्रा. विजय पॉल शर्मा यांनी दिला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४४ व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. व्हीएसआयचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, कृषी मूल्य आयोगाचे सल्लागार डॉ. डी. के. पांडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानदेव हापसे, व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख, व्हीएसआयचे कृषी संचालक विकास देशमुख, नियामक मंडळ सदस्य इंद्रजित मोहिते, आ. आशुतोष काळे व्यासपीठावर होते. एकल पीकपद्धत सोडावी कृषी मूल्य आयोगाने साखर उद्योगाला उपयुक्त सूचना केल्या. “कारखान्यांना माझी विनंती की त्यांनी खऱ्या शेतकऱ्यांबरोबर काम करावे. त्यांच्या समस्या सोडवाव्यात. साखरेकडून इतर मूल्य पदार्थांकडेदेखील वळले पाहिजे. केंद्र सरकार साखर उद्योगाला बळकटी देत आहे. त्यामुळे या काळात इतर पर्यायाकडे वळण्याची कारखान्यांकडे संधी भरपूर आहे. कारखान्यांनी आता ऊस शेतीत एकल पद्धत सोडण्यासाठी प्रयत्न करावेत. सूक्ष्म सिंचनाला चालना, आंतरपिके वाढविणे, इथेनॉलसाठी शुगरबीट व मका उत्पादन अशा पर्यायांवर कामे करावी लागतील. आपण साखर उद्योगाचे खांब आहोत. परिणामी समन्वय, संशोधन, प्रोत्साहन अशा विविध भूमिका साखर उद्योगातील घटकांना घ्यावा लागतील.” असे प्रा. शर्मा या वेळी म्हणाले. व्हीएसआयचे काम बिगर राजकीय ः वळसेपाटील शेतकऱ्यांसाठी अभिमानास्पद कामगिरी व्हीएसआय काम करते आहे. शेती सल्ला, संशोधन व प्रकल्प अहवाल अशी कामे येथे केली जातात. मूळ सहकारासाठी सुरू झालेली ही संस्था आता खासगी कारखाने व सामान्य शेतकऱ्यांसाठीदेखील थेट बांधावर जाऊन काम करते आहे. मात्र, येथे सर्व पक्षाचे पदाधिकारी असले तरी कामकाज राजकीय पद्धतीने न करता शेतीभिमुख व संशोधनात्मक पद्धतीने केले जाते, असे श्री. वळसेपाटील यांनी स्पष्ट केले. “केंद्र शासनाचे अनुदान मिळत नसतानाही व्हीएसआयकडून संशोधनाचे मोठे काम होते आहे. तुम्ही ही संस्था पाहावी. शेतकऱ्यांसाठी सुरू असलेले येथील काम तुम्ही पाहावे व तुम्ही शब्द टाकल्यास व्हीएसआयला मदत मिळू शकते,’’ अशी विनंतीदेखील श्री. वळसे यांनी कृषी मूल्य आयोगाला केली.

विद्यापीठांची संलग्नता जाणार ः कुलगुरू डॉ. कदम कस्तुरीरंगन अहवालाचा संदर्भ देताना या वेळी कुलगुरू शिवाजीराव कदम यांनी ९२२ विद्यापीठांना आता धोरणात्मक बदलासाठी तयार राहण्याचे आवाहन केले. “देशातील ४० हजार महाविद्यालयांची संख्या कमी करून १५ हजारांपर्यंत होणार आहे. विद्यापीठांची संलग्नता अस्तित्वात राहणार नाही. २०३२ पासून स्वायत्त विद्यापीठे पदवी देतील. या अहवालानुसार आता देशातील तीन वर्षांच्या मुलालादेखील पूर्वप्राथमिक शिक्षण नियोजनबद्धरीत्या देण्याचे ठरविले गेले आहे,” असेही डॉ. कदम म्हणाले. शेतकऱ्याला प्रथम प्राधान्य द्या ः प्रा. शर्मा कष्टकरी शेतकऱ्यांसाठी व्हीएसआय मोलाची भूमिका बजावत आहे. मात्र, आता आव्हाने मोठी आहेत. साखरेचे भाव, उसाचे दर असे मुद्दे साखर उद्योगासमोर आहेत. साखर उद्योगाच्या मूल्य साखळीतील प्रत्येक घटक आनंदी राहण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. अर्थात, या साखळीत शेतकऱ्याला पहिले प्राधान्य हवे. कारखान्यांना आपली प्रगतीदेखील सतत सुरू ठेवली पाहिजे. अन्यथा, त्याचे परिणाम शेतकऱ्यांच्या समृद्धीवर होतात. शेतकरी वर्गाने उसाचे जादा उत्पादन घ्यावे, असे सांगत असताना त्याला पीक मोबदलादेखील दिला पाहिजे,” असेही प्रा. शर्मा यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com