मेघालयातील शेतकऱ्यांनी केला पिंजऱ्यातील मत्स्यपालनाला प्रारंभ

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बराकपोर (कोलकत्ता) येथील केंद्रीय गोड्या पाण्यातील मत्स्यपालन संशोधन संस्था आणि उमियम येथील ईशान्येकडील पर्वतीय प्रदेश संशोधन विभाग यांनी पिंजऱ्यातील मत्स्यपालनाचा एक प्रकल्प राबवला आहे
Farmers in Meghalaya started cage structured  fishing
Farmers in Meghalaya started cage structured fishing

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बराकपोर (कोलकत्ता) येथील केंद्रीय गोड्या पाण्यातील मत्स्यपालन संशोधन संस्था आणि उमियम येथील ईशान्येकडील पर्वतीय प्रदेश संशोधन विभाग यांनी पिंजऱ्यातील मत्स्यपालनाचा एक प्रकल्प राबवला आहे भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बराकपोर (कोलकत्ता) येथील केंद्रीय गोड्या पाण्यातील मत्स्यपालन संशोधन संस्था आणि उमियम येथील ईशान्येकडील पर्वतीय प्रदेश संशोधन विभाग यांनी री-भोई (मेघालय) येथील उमियम तलावामध्ये पिंजऱ्यातील मत्स्यपालनाचा प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पामुळे सुमारे ५० स्थानिक मासेमार बांधवांना फायदा होणार आहे. त्यासाठी डी. मझाओ (अध्यक्ष) आणि ब्रघतस्टार (सचिव) यांच्या नेतृत्वाखाली री -भोई शेतकरी संघाची स्थापना करण्यात आली आहे. मेघालय राज्यातील री भोई जिल्ह्यामध्ये उमियम हा गोड्या पाण्याचा मोठा तलाव आहे. यामध्ये स्थानिक मासेमार बांधव पारंपरिक पद्धतीने मासेमारी करत असतात. त्यांना आधुनिक पद्धतीकडे वळवण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बराकपोर (कोलकत्ता) येथील केंद्रीय गोड्या पाण्यातील मत्स्यपालन संशोधन संस्था आणि उमियम येथील ईशान्येकडील पर्वतीय प्रदेश संशोधन विभाग यांनी पिंजऱ्यातील मत्स्यपालनाचा एक प्रकल्प राबवला आहे. त्या अंतर्गत संस्थेचे शास्त्रज्ञ आणि स्थानिक मासेमार बांधव यांनी एकत्रित काम केले आहे. त्यातून या ठिकाणी चांगल्या प्रकारे वाढू शकणाऱ्या माशांच्या जातींचा अभ्यास व शोध घेण्यात आला. त्यांना पिंजऱ्यामध्ये पहिल्या टप्प्यात सोडलेल्या तीन मत्स्य प्रजातींपैकी अमुर कार्प हे मासे या गोड्या तलावामध्ये व जाळ्यातील तग धरणे आणि वाढीसाठी अत्यंत योग्य असल्याचे दिसून आले. असे केले जाते पिंजऱ्यातील मत्स्यपालन री- भोई तलावामध्ये जाळ्याचे सहा पिंजरे बसवले आहेत. प्रति पिंजरा ६x४x४ वर्गमीटर असा सुमारे १०० घनमीटर आकार असून त्यातील पाण्याचे आकारमान ९० घनमीटर आहे. जाळ्यातील एकूण पाणी ५४० घनमीटर आहे. त्यात मायनर कार्प (कुहरी - Labeo gonius) सरासरी लांबी १२.०१ सेंमी आणि वजन १८.३१ ग्रॅम,अमुर कॉमन कार्प (११.०९ सेंमी, २०.४ ग्रॅम) आणि कोई कार्प (१०.८८ सेंमी, १९.८ ग्रॅम) या जातीच्या माशांची पिल्ले २४ सप्टेंबर २०१९ रोजी सोडण्यात आली. या माशांना प्रति दिन दोनवेळा या प्रमाणे त्यांच्या वजनाच्या ३ ते ५ टक्के तरंगते खाद्य देण्यात आले. गुवाहाटी येथील प्रादेशिक मत्स्य संशोधन केंद्र आणि उमियम येथील संशोधन केंद्र यांनी माशांच्या वाढ आणि पाण्याचा दर्जाबाबत नियमित देखभाल ठेवली. या तलावामध्ये स्थानिक मत्स्य शेतकऱ्यांकडून माशांच्या दैनंदिन खाद्याची व्यवस्था करण्यात आली. पाच महिने माशाचे पालन केल्यानंतर कुहरी माशांचे सर्वाधिक वजन २१७ ग्रॅम, अमुर कार्पचे वजन ६६० ग्रॅम आणि कोई कार्पचे वजन ६६५ ग्रॅम नोंदवण्यात आले. त्यांचे सरासरी वजन अनुक्रमे ९३.१ ग्रॅम, ३३९.५ ग्रॅम आणि २५८.४ ग्रॅम मिळाले. जाळ्यांमध्ये सर्वाधिक तग धरण्याचे प्रमाणे अमुर कार्प (८० टक्के) होते. त्यानंतर कोई कार्प आणि कुहरी हे मासे तग धरत असल्याचे दिसून आले. संपूर्ण कालावधीमध्ये कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव आढळला आहे. एकूण अभ्यासाअंती अमुर कार्प हे मासे या गोड्या तलावामध्ये व जाळ्यातील तग धरणे आणि वाढीसाठी अत्यंत योग्य असल्याचे दिसून आले. संपर्ण समाजाच्या फायद्यासाठी... या तलावातील जाळ्यातील मत्स्यपालनाचा फायदा सरळ येथील स्थानिक सहभागी मासेमारांना होणार आहे. या जाळे पद्धतीच्या मत्स्य पालनातून होणाऱ्या फायद्याचा काही भाग समाजासाठी म्हणून वेगळे काढण्यात येते. त्यासाठी उम्निउह ख्वान वेलफेअर फंड या नावाने खाते काढण्यात आले आहे. त्यातून स्थानिक मासेमार समूहासाठी फायद्याच्या योजना राबवण्याचे नियोजन केले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com