Agriculture news in marathi, Calav, Jitada fish Production Center in Sindhudurga | Agrowon

सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज उत्पादन केंद्र
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस प्रोत्साहन देण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग, कांदळवन व ‘सागरी जैवविविधता संवर्धन फांउडेशन’ने सिंधुदुर्ग येथे कालव बीज उत्पादन केंद्र उभारण्याबाबत केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेबरोबर (सीएमएफआरआय) त्रिपक्षीय सेवा करार केला. या शिवाय जिताडा बीज उत्पादन केंद्र उभारण्याबाबत ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॅकिशवॉटर ॲक्वाकल्चर’ (सीबा) सोबत करार केला.  

मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस प्रोत्साहन देण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग, कांदळवन व ‘सागरी जैवविविधता संवर्धन फांउडेशन’ने सिंधुदुर्ग येथे कालव बीज उत्पादन केंद्र उभारण्याबाबत केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेबरोबर (सीएमएफआरआय) त्रिपक्षीय सेवा करार केला. या शिवाय जिताडा बीज उत्पादन केंद्र उभारण्याबाबत ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॅकिशवॉटर ॲक्वाकल्चर’ (सीबा) सोबत करार केला.  

कालव आणि जिताडा ही दोन्ही मत्स्यबीज केंद्र वेंगुला (जि. सिंधुदुर्ग) तालुक्यातील उभा दांडा येथे उभारण्यात येईल. जिताडा मत्स्यबीज उत्पादन केंद्रामध्ये प्रतिवर्षी २० लाख मत्स्यबीजाचे उत्पादन घेण्यात येईल. या केंद्राची उभारणी आणि संचालनासाठी ‘सीबा’ तांत्रिक सहाय्य आणि सल्ला पुरविणार आहे. कालव बीज उत्पादन केंद्रामध्ये प्रतिवर्षी १ कोटी बिजाची निर्मिती केली जाणार आहे.

पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली या दोन करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. मत्स्यव्यवसाय आयुक्त राजीव जाधव, कांदळवन विभागाचे अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक एन. वासुदेवन, ‘सीबा’चे संचालक डॉ. के. के. विजयन, ‘सीएमएफआरआय''चे प्रधान संशोधक डॉ. पी. के. अशोकन, मत्स्यव्यवसाय सहआयुक्त राजेंद्र जाधव, मत्स्यव्यवसाय विभागाचे उपसचिव श्रीनिवास शास्त्री, कुला ॲक्वा कन्सल्टन्ट प्रा. लि.चे आर. कुलशेखरन आदी उपस्थित होते.

‘सीएमएफआरआय'' आणि सीबा या दोन संस्था भारतीय कृषी संशोधन परिषदेशी (आयसीएआर) संलग्न असून मत्स्यसंवर्धन, संशोधन व विकासामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

इतर बातम्या
संत्र्याला जागतिक बाजारपेठेत पोचवण्याचे...अमरावती : जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या...
पुणे जिल्ह्याच्या दुष्काळी भागात...पुणे ः गणपतीच्या विसर्जनानंतर पुन्हा पावसाने जोर...
बागलाण तालुक्यात शेतातून चंदनाची चोरीनाशिक  : बागलाण तालुक्यातील नवे निरपूर येथील...
तोलाई परिपत्रक होणार रद्द पुणे ः बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या...
भात, सोयाबीन पिके बहरलीचास, जि. पुणे ः खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम...
‘शेतकरी सन्मान’साठी २० हजार कोटी दिले...नाशिक : शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देत त्यांना मदत...
‘मी शेतकरी’ आंदोलनाला गांधी जयंतीपासून...नगर : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव तसेच...
शेतीपूरक व्यवसायांना राज्य शासनाची...सांगली ः अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास...
थकीत बिलासाठी मुंबईत दुग्धविकास आयुक्त...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील दुग्ध...
नाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक  : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...
आर्थिक मंदीमुळे देशातील शेती क्षेत्राला...नांदेड ः सध्या प्रचंड मंदी आहे. गुंतवणूक केली जात...
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...सातारा ः माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यांना...
विषबाधेच्या चौकशीची फाइल अडली गृह...नागपूर: प्रशासन गतिमान असल्याचा दावा सरकारकडून...
शेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...
दसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...
ठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...
पाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...
कापडे, हळनोर, कांबळे यांना यंदाचा ‘डॉ....पुणे ः ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘ॲग्रोवन’चे...
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...