Agriculture News in Marathi Came on the market in October 31.13 lakh bales of cotton | Agrowon

ऑक्टोबरमध्ये बाजारात आला ३१.१३ लाख गाठी कापूस 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 नोव्हेंबर 2021

कापूस हंगाम एक ऑक्टोबरला सुरू झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात कापूस आवकेत गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पुणे ः कापूस हंगाम एक ऑक्टोबरला सुरू झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात कापूस आवकेत गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये ३१.१३ लाख गाठी कापसाची आवक झाली. एक कापूस गाठी १७० किलोची असते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये २७.१६ लाख गाठी कापूस आवक झाली होती, असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीएआय) म्हटले आहे. देशात यंदा ३६०.१३ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज सीएआयने व्यक्त केला आहे. 

ऑक्टोबरमध्ये बाजारातील आवक ३१.१२ लाख गाठी, एक लाख गाठी आयात आणि मागील हंगामातील शिल्लक ७५ लाख गाठी, असा एकूण कापसाचा पुरवठा १०७.१२ लाख गाठींवर झाला. तर ऑक्टोबरमध्ये कापूस वापर २७.९१ लाख गाठींचा झाला. तर निर्यात ४ लाख गाठींची झाली. ऑक्टोबरमधील वापर आणि निर्यात वगळता देशात ७५.२१ लाख गाठी कापसाचा साठा आहे. यापैकी मिल्सकडे ४६.२१ लाख गाठी कापूस आहे.

मिल्सच्या गोडाउनमध्ये असलेला कापूस त्यांची सरासरी दैनंदिन गरज ५० दिवस भागवेल एवढा आहे. तर कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र कापूस पणन महामंडळ, बहुराष्ट्रीय कंपन्या, व्यापारी, जिनिंग आणि एक्चचेंज प्लॅटफॉर्म्सकडे २९ लाख गाठी कापूस साठा आहे. सूतगिरण्या आणि स्टॉकिस्ट यांनी खरेदी केलेला मात्र कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि कापूस पणन महामंडळाच्या गोडाउनमध्ये असलेला कापूस धरून ७५.२१ लाख गाठींचा देशात साठा आहे, असेही सीएआय म्हटले आहे. 

कापसाचे दर यंदा अधिक 
देशात कापसाचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाले आहेत. गुजरातमध्ये काही बाजार समित्यांत गेल्या हंगामात कापसाचा दर प्रति क्विटंल ४ हजार ३५५ रुपये होतो. तो सध्या ८ हजार ४०५ रुपयांवर पोचला आहे. पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटकातही कापसाला आठ हजार ते साडेआठ हजारांच्या दरम्यान दर मिळत आहे. 

असे राहील राज्यनिहाय उत्पादन (लाख गाठी) 
गुजरात---९६.९९ 
महाराष्ट्र---८६.४६ 
तेलंगणा---४५.९१ 
राजस्थान---२६.६७ 
कर्नाटक---२५.५५ 
मध्य प्रदेश---२०.५० 
हरियाना---१६.६० 
आंध्र प्रदेश---१४.३० 
पंजाब---१०.०७ 
(एक कापूस गाठ १७० किलो) 

ऑक्टोबरमधील राज्यनिहाय कापूस आवक (लाख गाठींत) 
गुजरात--- ७.६५ 
महाराष्ट्र--- ४.०६ 
तेलंगणा---२.७५ 
राजस्थान--- ५.१३ 
कर्नाटक--- २.७५ 
मध्य प्रदेश--- २.६८ 
हरियाना--- १.८१ 
आंध्र प्रदेश--- १.९० 
पंजाब--- १.२८ 
(एक कापूस गाठ १७० किलो) 

 


इतर अॅग्रो विशेष
...तर विमा कंपन्यांवर  गुन्हे दाखल...पुणे : शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे वेळेत न...
आंदोलन सुरूच राहणार : संयुक्त किसान...नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात...
राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाने उघडीप दिली...
परळी थर्मलमध्ये इंधनासाठी बांबूचा वापर...लातूर ः परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात...
पेप्सिकोच्या बटाटा वाणाचे  मालकी हक्क...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः केंद्र सरकारच्या...
मेंढ्यांच्या संरक्षणासाठी लवकरच योजना ...सुपे, जि. पुणे ः पावसाची संततधार, अतिवृष्टी व...
शेतकऱ्यांनी करून दाखवलं : डॉ. गौहर रझा नाशिक : नव्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी शेतकरी...
द्राक्ष पीकविमा योजना  विभागनिहाय...नाशिक : दोन दिवसांपासून राज्यात झालेल्या...
सोयाबीन दरातील सुधारणा  आठवड्याच्या...पुणे ः चालू आठवड्यात बुधवारनंतर सोयाबीन दरात...
‘जवाद’ चक्रीवादळाची  तीव्रता कमी होणारपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘जवाद’ चक्रीवादळ...
थंडीत वाढ शक्यमहाराष्ट्रावरील हवेचे दाब आज आणि उद्या १०१२...
मसाला उद्योगासोबत सेंद्रिय शेतीकडे...लवळे (ता.मुळशी, जि. पुणे) येथील ज्योती दत्तात्रय...
‘रिलायन्स’ पीकविमा भरपाई देण्यास तयारपुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी दहा...
नाशिकमध्ये भरला साहित्यप्रेमींचा मेळा नाशिक : येथील कुसुमाग्रज नगरीत रंगणाऱ्या ९४व्या...
देशात ४७.२१ लाख टन साखरेचे उत्पादनकोल्हापूर : देशातील साखर हंगाम वेगाने सुरू झाला...
बंगालच्या उपसागरात ‘जवाद’ चक्रीवादळाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची...
कृषी शिक्षणाचा टक्का घसरलापुणे ः राज्याच्या ग्रामीण अर्थकारणाचा गाडा...
राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची...पुणे : राज्यात बुधवारपासून (ता. १) पावसाने हजेरी...
राज्यातील द्राक्ष बागांना १० हजार...सांगली ः राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने पूर्व...
पामतेलाऐवजी सोयाबीन, सूर्यफूल तेलाला...पुणे ः पामतेलाचे दर वाढल्याने सोयाबीन आणि...