पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू

The campaign for election of gram panchayats in the district started
The campaign for election of gram panchayats in the district started

पुणे ः जिल्ह्यात पुढील वर्षी जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या सुमारे ७५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या प्रभागरचना, आरक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. परिणामी गावांमधील राजकीय वातावरण आता हळूहळू तापू लागले आहे. 

जिल्ह्यातील तगड्या व संवेदनशील ग्रामपंचायतींचा निवडणुकीत समावेश असून, सर्वाधिक चुरस खेड, भोर, शिरूर, पुरंदर तालुक्यांत पाहावयास मिळणार आहे. त्यामुळे स्थानिक नेतेमंडळीनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली असल्याचे दिसून येते. 

यंदा मार्च, एप्रिलपासून जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर चार महिन्यांनी विधानसभेची निवडणूक झाली. लोकसभा निवडणुकीदरम्यान बारामती, शिरूर मतदारसंघात भाजपविरोधात सुप्त लाट होती. त्या वेळी भाजप शिवसेनेने राष्ट्रवादीशी दोन हात केले होते. मात्र, शिरूरमध्ये परिवर्तन घडले. तर बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा संधी मिळाली. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीच्या निकालावरही दिसून आला. 

यात खेड, जुन्नर, पुरंदर, खेड मतदारसंघात परिवर्तनाची लाट आली. त्यातच राज्यात सत्तांतर नाट्य संपुष्टात आल्यानंतर महाविकास आघाडी सत्तेवर आली. त्यामुळे अनेक वर्षे एकमेंकाविरोधात लढणारी शिवसेना आता कॉँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचा घटक बनली आहे. त्याचा गाव पातळीवर फारसा परिणाम होणार नसला, तरी स्थानिक पातळीवरील नेत्यांनी अडचण होण्याची शक्यता आहे. 

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी, शिवसेनेत नेहमी चुरस पाहायला मिळते. मात्र, या वेळी कोणती भूमिका स्थानिक नेते घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात अवघ्या आठ ते नऊ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक प्रश्नांची फक्त चर्चा दिसण्याची शक्यता आहे. त्यातच पाच वर्षांत रखडलेले स्थानिक प्रश्न, विकासकामे, गटातटाचे राजकारण, विकासनिधीचे वाटप अशा विविध कारणांमुळे स्थानिक राजकारण उफाळून येणार आहेत. प्रत्येक गावांत दोन ते तीन गट सक्रिय आहेत. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप अशा विविध पक्षांची विचारधारा असलेले गट गाव पातळीवर आहेत. त्यामुळे काही नेते सोयीचे राजकारण म्हणून प्रस्थापित, विरोधकांच्या वळचणीला जातात. त्यातून चुरशीची लढत पाहावयास मिळणार आहे.

निवडणुका असलेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायतीची संख्या ः खेड ९१, भोर ७४, शिरूर ७३, जुन्नर ६७, पुरंदर ६६, इंदापूर ६१, हवेली ५५, मावळ ५७, दौड ५०, बारामती ४९, आंबेगाव ३०, मुळशी ४५, वेल्हा ३१.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com