Agriculture news in Marathi, The camps will continue till the city gets good rain | Agrowon

नगरमध्ये चांगला पाऊस पडेपर्यंत छावण्या सुरू राहणार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 19 जून 2019

नगर : नगर जिल्ह्यामध्ये ४९८ छावण्या सुरू आहेत. चार दिवसांपूर्वी झालेल्या पूर्वमोसमी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे सहा छावण्यातील जनावरांची संख्या घटली आहे. शासनाने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा कमी जनावरे असल्याने प्रशासनाच्या दृष्टीने त्या छावण्या बंद आहेत. दरम्यान चांगला पाऊस पडेपर्यंत किंवा शासनाचे आदेश येईपर्यंत जनावरांच्या छावण्या सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले. 

नगर जिल्ह्यामध्ये यंदा गंभीर दुष्काळाला सामोरे जावे लागले. दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी शासनाकडून छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. यंदा नगर जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक ५०३ छावण्या सुरू केल्या. 

नगर : नगर जिल्ह्यामध्ये ४९८ छावण्या सुरू आहेत. चार दिवसांपूर्वी झालेल्या पूर्वमोसमी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे सहा छावण्यातील जनावरांची संख्या घटली आहे. शासनाने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा कमी जनावरे असल्याने प्रशासनाच्या दृष्टीने त्या छावण्या बंद आहेत. दरम्यान चांगला पाऊस पडेपर्यंत किंवा शासनाचे आदेश येईपर्यंत जनावरांच्या छावण्या सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले. 

नगर जिल्ह्यामध्ये यंदा गंभीर दुष्काळाला सामोरे जावे लागले. दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी शासनाकडून छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. यंदा नगर जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक ५०३ छावण्या सुरू केल्या. 

चार दिवसांपूर्वी नगरमधील काही भागांत पूर्वमोसमी पाऊस झाला. त्यामुळे छावण्यात दाणादाण उडाली, अनेक शेतकऱ्यांनी छावण्यातील जनावरे घरी नेली. त्यामुळे त्या छावण्यात आता सरकारी मर्यादेपेक्षा कमी जनावरे असल्याने त्या छावण्या प्रशासनाच्या दृष्टीने बंद झाल्या आहेत. त्यात जामखेडमधील ३, शेवगावातील २ आणि नगरमधील १ अशा तीन तालुक्‍यांतील चारा छावण्यांचा समावेश आहे. परंतु, पाऊस थांबल्याने शेतकऱ्यांनी बंद पडलेल्या छावण्यांत पुन्हा मर्यादेपेक्षा कमी प्रमाणात जनावरे दाखल करण्यास सुरवात करू लागले. 

जून महिना संपत आला तरी अजूनही पुरेसा पाऊस नाही. सध्या जिल्ह्यामध्ये ४९८ छावण्या सुरू असून आजअखेर ४९८ छावण्यांमध्ये तीन लाख ३० हजार पशुधन दाखल आहेत. अजून पाऊस नसल्याने चारा, पाण्याचा प्रश्‍न गंभीर आहे. त्यामुळे चांगला पाऊस पडेपर्यंत किंवा सरकारचे आदेश येईपर्यंत जनावरांच्या छावण्या सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
राज्यात गवार प्रतिक्विंटल १२०० ते ६०००...जळगावात प्रतिक्विंटल ५६०० रुपये जळगाव ः कृषी...
पीकविम्याला मुदतवाढ देण्याची ‘...अकोला ः या हंगामात पीकविमा भरण्यासाठी २४ जुलै ही...
परडा येथे मक्यावर लष्करी अळीचा...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मक्यावर मोताळा...
अमरावती जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का...अमरावती  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३६१० रुपये...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
सातारा जिल्हा परिषदेचा १०० कोटींचा...सातारा : जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच मूळ...
पुण्यात पीकविम्यासाठी शिवसेना रस्त्यावरपुणे ः ‘कोण म्हणतो देणार नाय विमा घेतल्याशिवाय...
पुणे विभागातील कोरडवाहू पट्ट्यात टंचाई...पुणे : विभागातील पुणे, सातारा, कोल्हापूर...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उतरविला १...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गंत खरिपासाठी...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १५ चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील घटलेली चारा छावण्यांची...
अचूक पीक पेरणी अहवाल देणे शक्य नाही ः...बुलडाणा  ः जिल्ह्यातील पीक पेरणीचा...
आडसाली ऊस लागवडीला कोल्हापूर जिल्ह्यात...कोल्हापूर  : जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात...
परभणी कृषी विद्यापीठ उत्पादित अडीच हजार...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...
‘शेतकरी सन्मान’साठी ९१.३३ टक्के ...अकोला  ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम...
एचटी कापूस बियाण्यांबाबतचा अहवाल १५...मुंबई  : प्रतिबंधित एचटी (हर्बीसाइड टॉलरंट)...
शिवसेना शेतकऱ्यांची दिशाभूल करतेय ः...मुंबई  ः पीकविम्यासंदर्भात विमा कंपन्यांवर...
पीकविम्याचे पैसे पंधरा दिवसांत न...मुंबई  : कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांची...
फळपीक विमा योजनेला मुदतवाढ देण्याची...पुणे  : राज्यातील दुष्काळी स्थिती आणि...
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....