क्षारयुक्त जमिनीतही करता येईल खजुराची लागवड

क्षारयुक्त जमिनीतही करता येईल खजुराची लागवड
क्षारयुक्त जमिनीतही करता येईल खजुराची लागवड

राजस्थान, गुजरातमध्ये खजूर हे पीक चांगल्या प्रकारे रूजत आहे. गुजरात येथील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरील या पिकाच्या लागवडीतील अनुभव राज्यातील शेतकऱ्यांना माहितीस्तव उपयोगी ठरू शकतो. 

खारीक किंवा खजूर हे उष्णता सहन करणारे फळझाड असून, त्याला फक्त पक्वता आणि फळे पिकण्याच्या वेळी पाऊस आणि आर्द्रतेची गरज असते. जातीपरत्वे २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असली तरी हे फळझाड ५० अंश सेल्सिअस तापमानातही तग धरून राहते. खजूर पिकासाठी रेती- पोयटामिश्रित माती, पाण्याची धारणक्षमता कमी असलेली आणि अधिक सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन असावी. विशेष म्हणजे क्षारयुक्त जमिनीतही हे पीक घेता येते. त्याचप्रमाणे मातीचा सामू ८.५ पर्यंत असतानाही हे पीक चांगले उत्पादन देते.

खजुराची लागवड ऑगस्ट - सप्टेंबर किंवा मार्च - मे महिन्यामध्ये ७ मीटर बाय ७ मीटर अंतरावर १ मी. बाय १ मी. बाय १ मी. आकाराचे खड्डे करून घ्यावेत. त्यामध्ये वरील थरातील सुपीक माती, रेती व सेंद्रिय पदार्थ ३ः१ः१ या प्रमाणात भरून घ्यावेत. या खड्ड्यामध्ये रोपांची लागवड करावी.

खजूर झाडांची फळधारणा खजूर झाड हे जनुकीयदृष्ट्या द्विलिंगी आहे. नर झाडे ही मादी फुलांच्या परागीभवन आणि फलन प्रक्रियेसाठी अत्यंत आवश्यक असतात. साधारण १०० मादी झाडांमागे २ ते ३ नर झाडे पुरेशी ठरतात. योग्य प्रकारे परागीभवन आणि फलन प्रक्रिया झाल्यानंतर खारीक तयार होते.

परागीभवन

  • मादी फुले झाडांवर उमललेली असताना नराच्या झाडापासून फुलांचे घड तोडून मादी फुलांच्या घडांमध्ये ठेवून द्यावीत, त्यामुळे परागीभवन होऊन, फलन प्रक्रियेला वेग मिळेल.
  • झाडावरील घड आणि घडांवरील फळांची संख्या निश्चित करणे
  •  पुढील वर्षाच्या फलधारणेसाठी चालू वर्षात झाडांवर घडांची व घडांमध्ये फळांची संख्या निश्चित ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे घडांची संरचना मोकळी होऊन चांगली वाढ होते. जातीपरत्वे ५ वर्षे वयाच्या झाडांवर ३ ते ५ घड असावेत. भारतीय वातावरणामध्ये एका झाडावर ८ ते १० घड ठेवणे शक्य आहे. अशा प्रकारे साधारण १३०० ते १६०० खारीक फळे एका झाडावर असावीत.
  • यापेक्षा अधिक घडांची विरळणी करावी. घडाच्या आतील बाजूंच्या स्ट्रॅन्डची विरळणी करावी. जातीनिहाय १/३ किंवा १/२ स्ट्रॅन्ड कट करून फुले काढून टाकावीत. अशा प्रकारे २५ ते ५० टक्के घडांची विरळणी करावी.   
  • खजूर पिकांच्या आर्थिक बाबी (एक एकर क्षेत्रासाठी)

  •  ७ बाय ७ मीटर अंतरासाठी - ऊती संवर्धित ८२ रोपे लागतात, तर ९ बाय ९ मीटर अंतरासाठी ५० रोपे लागतात.
  •  रोपांची किंमत जातीनिहाय वेगवेगळी असते. साधारणतः ३५०० ते ४५०० रुपये प्रतिझाड. झाडांच्या संख्येनुसार १.७४ लाख ते ३.६९ लाख रुपयांपर्यंत रोपांसाठी खर्च येऊ शकतो.
  •  तिसऱ्या वर्षापासून उत्पादनाला सुरवात होते. उत्पादनाच्या पहिल्या वर्षी प्रतिझाड ३० किलो खारीक (ओले), दुसऱ्या वर्षी ५० किलो, तर तिसऱ्या वर्षी २०० किलो ओले खारीक मिळतात.
  •  ओली खारीक प्रतिकिलो १०० ते २०० रुपये दराने विकली जाते. यात जातनिहाय व बाजारातील चढ- उतारानुसार फरक होऊ शकतो. मात्र सामान्यपणे पाच वर्षांनंतर प्रतिझाड ३० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.
  • रोपांची निवड खजूर रोपांची अभिवृद्धी बिया आणि शाकीय पद्धतीने (सकर्स) करता येते. खजूर हे द्विलिंगी पीक असून, बियांद्वारे अभिवृद्धी केल्यास त्यातीन निम्मी रोपे मादी, तर निम्मी नर वृक्ष होतात. अशा वृक्षापासून ५ ते ६ वर्षांनी फळधारणा सुरू होते, तोपर्यंत नर वृक्ष लक्षात येत नाहीत. म्हणजे पाच वर्षे सांभाळल्यानंतर ही झाडे काढून टाकावी लागतात. त्याऐवजी अलीकडे शाकीय पद्धतीचा अवलंब रोपांच्या निर्मितीसाठी केला जातो. शाकीय पद्धतीसाठी साधारण १० ते ३० सेंमी व्यासाचे व १५ ते ३० किलो वजनाचे सकर्स लागवडीसाठी वापरावेत. अशा सकर्सच्या यशस्वितेचे प्रमाण ८० ते ९० टक्क्यांपर्यंत असते.

    ऊती संवर्धन पद्धतीचे फायदे

  • आनुवांशिकदृष्ट्या खात्री मिळते.
  • अधिक रोपे कमी कालावधीत तयार करता येतात.
  • आवश्यकतेनुसार नर आणि मादी रोपांचे प्रमाण ठेवता येते.
  • अशा रोपांपासून फळे तीन वर्षांपर्यंत मिळू शकतात.
  • उती संवर्धन पद्धतीची रोपे ५२ अंश सेल्सिअसपर्यंतच्या तापमानामध्ये तग धरून राहतात.
  • भरी, मेडझुल, शरण यांसारख्या जातींची ऊती संवर्धन पद्धतीने रोपे तयार करून, त्यांची लागवड ९ मीटर बाय ९ मीटर अंतरावर करावी.
  •  ः डॉ. पी. ए. साबळे, ८४०८०३५७७२ (सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, सरदार कृषिनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, गुजरात)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com